डिझायनरवरून नाईके आणि आदिदासमध्ये टस्सल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 15:07 IST
नाईकेने डिझायनर मार्क डोल्सेवर कोर्टात खटला दाखल केला की, आदिदासला आमच्या भविष्यातील बिझनेस प्लॅन्स शेअर करतील.
डिझायनरवरून नाईके आणि आदिदासमध्ये टस्सल
स्पोर्ट शूज ब्रँड नाईके आणि आदिदासमध्ये आता न केवळ बाजारपेठेतील स्पर्धा चालू आहे तर, शूज डिझायनवरूनही बरेच वादंग सुरू आहेत. 2014 मध्ये डिझायनर मार्क डोल्से, मार्क मायनर आणि डेनिस डेकोविच यांनी नाईके सोडून आदिदासमध्ये जाण्याचा निर्णय घोषित केला होता.यामुळे नाराज झालेल्या नाईकेने त्यांच्यावर कोर्टात खटला दाखल केला की, हे तिघे सर्वात मोठी स्पर्धक कंपनी आदिदासला आमच्या भविष्यातील संकल्पना आणि बिझनेस प्लॅन्स शेअर करतील.एवढेच नाही तर कंपनीने असा देखील आरोप केला की, कंपनीसोबत काम करत असतानाच तिघांनी कंपनीचे गुप्त ईमेल्स, आगामी शूज डिझाईन्स आणि इतर संवेदनशील माहिती आदिदासला पुरवली.मार्क डोल्सेवर अशा आरोपांचा काही परिणाम झालेला दिसत नाही. नुकतेच त्याने त्याच्या फेसबुकवर घोषणा केली की, तो आदिदासमध्ये उपाध्यक्ष आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून रुजू झाला आहे. स्पोर्ट शूजच्या मार्केटमध्ये आदिदासने नाईकेला जोरदार टक्कर देण्यास सुरूवात केली आहे. नाईकेच्या मक्तेदाराला शह देण्यासाठी आदिदासने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.