शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

​‘दंगल’ चित्रपटातून प्रेरणा घेऊन होऊ शकता यशस्वी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 14:53 IST

आयुष्यात चढउतार येतातच. मात्र बरेचजण थोडे जरी अपयश आले तर पूर्णत: खचतात आणि आपले जीवनच संपवतात. आयुष्यात अपयशाने खचणाऱ्यासाठी मात्र ‘दंगल’ चित्रपट एक प्रेरणादायी ठरु शकतो.

-Ravindra Moreआयुष्यात चढउतार येतातच. मात्र बरेचजण थोडे जरी अपयश आले तर पूर्णत: खचतात आणि आपले जीवनच संपवतात. आयुष्यात अपयशाने खचणाऱ्यासाठी मात्र ‘दंगल’ चित्रपट एक प्रेरणादायी ठरु  शकतो. यात महावीर सिंघ फोगाट यांच्या संर्घषाची कहाणी आहे. त्यांनी अनेक अड्चणींवर मात करुन आपल्या मुलींना स्वत: कुस्ती शिकवून त्यांना योग्य मार्गदर्शन देउन भारतासाठी सुवर्णपदक मिळवून दिले. या चित्रपटाची प्रेरणा घेऊन आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो. * आहे त्यात समाधान मानून त्यातुनच नवनिर्माण कराआयुष्य म्हणजे इच्छापुर्तींचा कारखाना नव्हे. इथे आपल्याला जे हवे आहे ते आपणहून मिळवावे लागते. महावीर सिंघ फोगाट यांचे सुवर्णपदक मिळविण्याचे स्वप्न होते, परंतु वडिलांच्या निबंर्धामुळे ते फक्त राष्ट्रीय पातळी  पर्यन्तच येऊ शकले. त्यांनी पुढे आपल्या मुलाला स्पर्धेत उतरवून आपले स्वप्न साकार करण्याचे स्वप्न बघितले. परंतु नशिबाने त्यांचे स्वप्न साकार करण्यात अडथळे आणले. त्यांच्या पत्नीने तीन वेळा मुलीनांच जन्म दिला.परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपले स्वप्न आपल्या मुलींमध्ये साकारले. त्याचप्रमाणे नवीन उद्योजकांना पुष्कळ वेळा हवे तसे ग्राहक / कर्मचारी / गुंतवणूकदार मिळत नाही त्यावेळी सर्वात महत्वाचे असते कि जे आपल्याजवळ आहे त्याचा योग्य वापर करुन चांगल्यात चांगले उत्पादन काढायचे. साध्यात साधा कारागीर सुद्धा आपल्या कौशल्याने आणि चांगल्या सल्ल्याने आपल्या कामात तरबेज होऊ शकतो. * बलस्थाने ओळखून त्यावर फोकस करामहावीर सिंघ स्वत:शाकाहारी होते परंतु मुलींना चांगले शरिरसौष्ठ्व देण्यासाठी त्यांना मांसाहार(चिकन) देणे महत्त्वाचे होते मात्र आर्थिक परिस्थितींमुळे त्यांना ते शक्य नव्हते. तरीही त्यांनी चिकन विक्रेत्याला नाममात्र दरात चिकन देण्यास भाग पाडले.आणि त्याला खात्री करुन दिली कि त्याच्या या उपकारामुळे त्यांच्या मुली पुढे जाऊन सुवर्णपदक मिळवतील. त्याचप्रमाणे नवीन उद्योजकांनाही सप्लायर्स हवे असतात. परंतु आवश्यक ती विश्वासार्हता किंवा बाजारात नाव नसल्यामुळे नवीन उद्योजकांनाही वाजवी दरात सप्लायर्स मिळविणे कठिण जाते. अशावेळी दंगल' चित्रपटातुन आपण हे शिकू शकतो कि समोरच्याला आपल्या बरोबर व्यवहार किंवा उद्योग केल्याने भविष्यात फायदा होऊ शकतो हे पटवून देणे फार महत्त्वाचे आहे.  * मिळालेल्या संधीचे सोनं करा‘दंगल’ चित्रपटात दाखविल्याप्रमाणे आपल्याला नवीन काही शिकता येत असेल तर ते अंगीकारले पाहिजे,नुसत्या जुन्याच कल्पना घेऊन पुढे जाणे धोकादायक ठरू शकते. गीताने आपल्या नॅशनल चॅम्पियनशिप  नंतर आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप पदाच्या विजेते पदासाठी गेली असताना आपल्या नवीन कोचच्या शिक्षणाचा अवलंब केला आणि विजेतेपदाकडे वाट्चाल केली. त्याचप्रमाणे नवीन उद्योजकांनाही आपल्या उद्योग वाढीसाठी नवनवीन संधींचा,धोरणांचा,कल्पनांचा विचार करून त्यांचा वापर करुन आपला उद्योग वाढविला पाहिजे.* धोका पत्कराज्याप्रमाणे 'दंगल' चित्रपटात दंगल स्पर्धेत पुरुषांएवजी मुलींना खेळ्ण्याचा निर्णय देऊन त्या स्पर्धेकडे पाहण्याची प्रेक्षकांना नवीन दिशा दिली आणि जी अतिशय यशस्वी झाली. त्याचप्रमाणे उद्योजकांनीही आपला उदयोग वाढविण्यासाठी आवश्यक असल्यास धोका पत्करला पाहिजे. नविन प्रयोग केले पाहिजेत. काही प्रयोग फसतील त्याची फार चिंता न करता त्यापासुन शिकून पुढे गेले पाहिजे. परंतु आपण धोका पत्करलाच नाही तर आपल्याला उद्योजक म्हणवता येणार नाही.कारण जसे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे तसेच रिस्क घेणे आणि उदयोग वाढविणे ही यशस्वी उदयोगाची गुरुकिल्ली आहे.