800 मुलांचा बाप असल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 04:52 IST
1000 मुलांचा बाप होऊन जागतिक विश्वविक्रम करण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे.
800 मुलांचा बाप असल्याचा दावा
‘लहान कुटुंब सुखी कुटुंब’ अशी पद्धत रुढ झाली आहे. एखाद्याला मुलांची हौस असेल तर तो फारतर दहा मुलांचा बाप होणे पंसत करेल. मात्र, कल्पनेच्या पलिक डे जाऊन एका व्यक्तीने आपण 800 मुलाचा बाप असल्याचा दावा केला आहे. येथेच त्याची इच्छा पूर्ण झाली नाही तर तो येत्या 4 वर्षांत 1000 मुलांचा बाप होऊन जागतिक विश्वविक्रम करण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे. सायमन व्हॉट्सन असे 800 मुलांचा बाप असणाºया व्यक्तीचे नाव आहे. व्हॉट्सन हा एक अनअधिकृत शुक्राणु डोनर असून तो त्याचे शुक्राणू केवळ 50 पाउंडमध्ये विकतो.त्याला सर्वाधिक ग्राहक हे फेसबुकच्या माध्यमातून मिळतात असे तो सांगतो. आपले स्पेनपासून ते ताइवानपर्यंत सर्वच देशात आपत्ये आहेत. मला जगात सर्वाधिक मुलांचा बाप असण्याचा विश्वविक्रम निर्माण करायचा आहे जो की कुणीच मोडू शकणार नाही अशी इच्छा सायमनने व्यक्त केली आहे. मात्र तो अधिकृत रित्या केवळ एकाच मुलीचा बाप आहे.