क्रिस गेल बनला ‘बाप’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 21:56 IST
विश्वचषक टी-२० चॅम्पियन टीम वेस्टइंडिजचा स्टार खेळाडू क्रिस गेलची प्रेयसी नताशा बैरिज आई बनली असून तिने एका गोड मुलाला जन्म दिला आहे.
क्रिस गेल बनला ‘बाप’
विश्वचषक टी-२० चॅम्पियन टीम वेस्टइंडिजचा स्टार खेळाडू क्रिस गेल आयपीएलमधील आपल्या दोन मॅच आता खेळणार नाही. या दोन मॅच अर्धवट सोडून गेल जमैकाला परतला आहे. गेलची प्रेयसी नताशा बैरिज आई बनली असून तिने एका गोड मुलाला जन्म दिला आहे. ही गोड बातमी ऐकून गेलला राहावले नाही आणि तो जमैकाला नताशाजवळ पोहोचला. वाटेत असताना त्याने एक फोटो टिष्ट्वटरवर पोस्ट केला आणि ‘आॅन माय वे, बेबी’ असे लिहिले. जमैकाला पोहोचल्यानंतरचा एक फोटोही त्याने शेअर केला.