शस्त्रक्रियेमुळे बदलला आवाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 05:22 IST
ब्रिटिश पॉप स्टार अडेले हिच्या घशावरील शस्त्रक्रिया आणि गर्भारपणाच्य...
शस्त्रक्रियेमुळे बदलला आवाज
ब्रिटिश पॉप स्टार अडेले हिच्या घशावरील शस्त्रक्रिया आणि गर्भारपणाच्या काळात आवाज बदलला असे म्हटले आहे. सुरुवातीच्या काळातील माझा आवाज आणि आताचा आवाज यात खूप फरक असल्याचेही तिने म्हटले आहे. आधीचा आवाज आणि शस्त्रक्रियेनंतरचा आवाज वेगळाच येत आहे. त्यामुळे काही कार्यक्रमदेखील रद्द करावे लागल्याचे तिने म्हटले आहे. तसेच आवाज बदलल्याने 2011 मध्ये घशावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय मी घेतला होता.त्यानंतर मात्र माझा आवाज चांगला झाल्याचे तिने म्हटले आहे. बदललेला आवाज पुन्हा मिळविण्यासाठीच मी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच घशावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे मला पुन्हा माझा आवाज मिळाल्याचेही तिने सांगितले आहे. शस्त्रक्रियेनंतर आवाज थोडा बदललेला वाटला आणि स्वच्छ वाटत होता. हे खरं आहे की, मी धूम्रपान सोडल्याचाही तो परिणाम असावा. पण, शस्त्रक्रियेनंतर खूपच फरक पडल्याचे ती म्हणाली, असून आता मिळालेला आवाज हा माझा नवा ब्रँड झाल्याचेही तिने सांगितले आहे.