थंडीत सर्वोत्तम कपडे वापरणारे सेलेब्रिटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:00 IST
कपड्यांची उत्सुकताइतर वेळेत सेलेब्रिटी कोणते कपडे वापरतात, हे साºयांना माहिती असते. पण थंडीत सेलेब्रिटी कोणते कपडे वापरतात, हे पाहणे औत्सुक्याचे दिसेल.
थंडीत सर्वोत्तम कपडे वापरणारे सेलेब्रिटी
आपल्या नेहमीच्या पेहरावामध्ये सचिन तेंडुलकरला पाहणं कायमच आनंददायी असतं. पण क्रिकेटपटू रोहित शर्माच्या विवाहानिमित्त झालेल्या स्वागत समारंभात सचिननं केलेला पेहराव नक्कीच शोभणारा नव्हता. कारण एखाद्या गोल्फ सामन्यासाठी किंवा पूल पार्टीसाठी शोभणारा स्कार्फ, कॅज्युअल टीशर्ट, शॉर्टस-ट्राउझर त्यानं घातला असता, तर समजू शकलं असतं.शाहरुख खानशाहरुख हा थंडीमध्ये रंगसंगती राखण्यासाठी विशेष कपडे निवडतो. त्यावर स्टायलिश दिमाखदार नॉट सर्वांचा आकर्षण बिंदू असते.ह्यू ज्ॉकमनज्ॉकमननं सभ्य गृहस्थांना शोभणारा पेहराव करतो. चौकटीचा उबदार लोकरी स्कार्फ तो थंडीपासून बचावासाठी घालत असतो. ज्ॉकमनच्या सडपातळ अंगकाठीवर हा पोशाख शोभून दिसतो.विक्रम बैद्यनाथआपण घातलेल्या पेहरावाचा ब्रँड मिरवणं फार आदर्श समजलं जात नाही. पण तुम्ही एखाद्या ब्रँडच्या प्रेमातच पडला असाल, तर मग कशाची पर्वा. ब्रँडचा मोनोग्राम असलेला स्कार्फ हा सर्वांचं लक्ष वेधून घेतोच. पण विक्रम बैद्यनाथनं त्यावर ज्ॉकेटऐवजी स्वेटर घातला असता, तर आणखी छान दिसलं असतं.जॉनी डेपरंगसंगती अजिबात न जुळणारा मिसमॅच पोशाख जॉनी करीत असतो. हॅट, ढगळ ज्ॉकेट, जार लांब असलेला स्कार्फ तो गळ्य़ाभोवती लपेटतो. त्याला फॅशनवर बारकाईनं नजर ठेवणार्यांची जणू पर्वाच नाहीये. पण त्याचं हे रुपडंही अधिक आकर्षक दिसते.