शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

पावसाळ्यातल्या वातावरणाचा आनंद साजरा करताना अंगावरही हवा निसर्गाचा साज.. यंदाच्या पावसाळ्यात बॉटनिकल ड्रेस घालून तर पाहा!

By admin | Published: July 14, 2017 4:20 PM

फॅशनच्या जगतातील बॉटनिकल ड्रेस ट्राय करण्याचा हा अगदी परफेक्ट सीझन आहे.

- मोहिनी घारपुरे-देशमुख‘ बॉटनिकल ड्रेसेस’ नाव वाचून बुचकळ्यात पडलात ना .. ‘आता अभ्यासातली बॉटनी कपड्यांमध्ये कुठे टपकली’ असं काही वाटलं असेल तुम्हाला क्षणभर . पण थांबा, बॉटनिकल ड्रेस म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपल्या साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर फ्लोरल प्रिंट असलेले झुळझुळीत कपडे. या प्रिंट्समध्ये विविध प्रकारची फुलं, तऱ्हेतऱ्हेची पानं यांच्या छटा दाखवलेल्या असतात. प्रत्येकच वेळेला या प्रिंट्ससाठी सिमेट्रीचा वापर केला जायलाच हवा असंही बंधन नाही. त्यामुळे ड्रेसला शोभेल अशा रितीनं आणि साधारणत: हटके परंतु तरीही ड्रेसची आकर्षकता कमी होणार नाही अशा प्रकारे ही प्रिंट या ड्रेसवर ठिकठिकाणी दिल्याचं दिसतं. पावसाळा आणि बॉटनिकल ड्रेस  पावसाळा म्हणजे हिरवा ॠतू. जिकडे तिकडे निसर्गाचं सौंदर्य बहरलेलं सध्या दिसतं आहे. हिरवेगार गवत, वृक्षवेली वाऱ्यावर डोलत आहेत. छोटी छोटी रंगीबेरंगी फुलं इवल्या इवल्या पानांमधून वाऱ्यासंगे डोकावून बघत आहेत. सृष्टीचा असा साज फक्त पावसाळ्यातच पाहायला मिळतो. मग हा आनंद आपणही साजरा करायला हवा ना. त्यासाठीच फॅशनच्या जगतातील बॉटनिकल ड्रेस ट्राय करण्याचा हा अगदी परफेक्ट सीझन आहे. एरवी फुलाफुलांच्या डिझाईनचे कपडे लहान आणि किशोरवयीन मुलींच्या वॉर्डरोबमध्ये हमखास बघायला मिळतात. पण बॉटनिकल ड्रेसेस पंचविशीपासून ते अगदी पस्तीशीपर्यंतच्या बायकाही आरामात घालू शकतात. विशेषत: पावसाळ्यातल्या संध्याकाळी कुठे बाहेर फिरायला जाताना बॉटनिकल ड्रेसेस तुम्ही परिधान केलेले असतील तर बाहेरच्या वातावरणाशी तुमचा लूक एकदम मॅच होवून जाईल. आपला आणि वातावरणाचा मूड एकच असेल तर एकदम भारी वाटतं.

 

व्हरायटी काय? बॉटनिकल ड्रेसेसमध्ये खूप व्हरायटी आहे. डिझाईनमध्येही विविधता आहे. चॉइसला जागा आहे. विशेषत: आॅनलाईन मार्केटमधील आघाडीच्या फॅशन साईट्सवर अत्यंत सुंदर सुंदर असे बॉटनिकल ड्रेसेस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यातही, मॅक्सी, मिनी, टॉप्स, कुर्तीज या प्रकारांमध्ये हे ड्रेसेस मुख्यत्त्वानं उपलब्ध आहेत. फ्रेश कलर्स जसे हिरवा, पिवळा, लाल, गुलाबी, आकाशी अशा रंगांचा मोठ्या प्रमाणावर वापर ही या ड्रेसेसची आणखी एक खासियत. हे रंग इतके आकर्षक असतात की या प्रिंट्सची भुरळच पडते. मात्र असं असलं तरीही अनेकदा या फ्लोरल प्रिंट्स फार बटबटीतही असू शकतात. त्यामुळे अशा ड्रेसेसची निवड करताना डोळ्यांना सुखावह असणाऱ्या प्रिंट्सचीच निवड करावी .

 

तुम्हीच तुमच्यासाठी तयार करा बॉटनिकल ड्रेस ज्यांना फॅब्रिक पेंटींग, क्र ोशा यांची आवड आहे अशा तरूणी त्यांचा बॉटनिकल ड्रेस स्वत:च तयार करू शकतात. कसं . तुमच्या आवडीचं फुलाफुलांच डिझाईन निवडा आणि एखाद्या प्लेन रंगाच्या कुर्तीवर, ड्रेसवर ते तुमच्या हातानं फॅब्रिक कलर्सच्या माध्यमातून रंगवा. किंवा रंगीबेरंगी दोऱ्यांच्या सहाय्यानं ते विणा. याशिवाय तुम्ही प्रत्यक्ष डेलिया, जरबेरा अशा फुलांच्या मदतीनेही बॉटनिकल ड्रेसवरील फ्लोरल प्रिंट घरीच तयार करू शकता. त्या त्या फुलांना हवा तसा रंग देऊन नंतर ते फुलच रंगांच्या बाजूनं कपड्यावर ठेऊन त्याचे तुम्हाला हवे त्या आकारात किंवा रँडम शिक्के द्या की झाला तुमचा बॉटनिकल ड्रेस तयार.