बिटल्सची गाणी देशात प्रथमच आॅनलाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2016 04:39 PM2016-06-17T16:39:08+5:302016-06-17T22:09:08+5:30

बिटल्सची गाणी प्रथमच आपल्या देशात आॅनलाईन स्ट्रिमिंगसाठी उपलब्ध होणार आहेत.

Bitts song online in the country for the first time online | बिटल्सची गाणी देशात प्रथमच आॅनलाईन

बिटल्सची गाणी देशात प्रथमच आॅनलाईन

Next
गीत विश्वातील सर्वाधिक प्रसिद्ध आणि दंतकथा बनलेला म्युझिक बँड ‘बिटल्स’च्या भारतातील चाहत्यांना एक खुश खबर आहे.

बिटल्सची गाणी प्रथमच आपल्या देशात आॅनलाईन स्ट्रिमिंगसाठी उपलब्ध होणार आहेत.

म्युझिक स्ट्रिमिंग सर्व्हिस ‘सावन’ आपल्या यूजर्सना या ब्रिटिश बँडचे १३ रि-मास्टर्ड स्टुडिओ अल्बम्स आणि सहा एसेंशियल कलेक्शन्स आॅनलाईन ऐकण्याची सुविधा देणार आहे.

मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात बिटल्सची गाणी आॅनलाईन स्ट्रिमिंगवर प्रथमच लाँच करण्यात आली होती. तेव्हापासून भारतात ती कधी ऐकायला मिळणार याची बँडचे चाहते प्रतीक्षा करत होते.

‘सावन’चे सहसंस्थापक परमदीप सिंग यांनी म्हणाले की, ‘द बिटल्स’ हा आयकॉनिक बँड होता ज्याशी कोणाचीच तुलना केली जाऊ शकत नाही. लहानथोरांना त्यांच्या गाण्यांचे वेड आहे. आपल्या प्लॅटफॉर्मवरून भारतात त्यांची गाणी उपलब्ध करून देणे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.

‘प्लिज प्लिज मी’, ‘विद दि बिटल्स’, ‘मॅजिकल मिस्ट्री टूर’, ‘लेट इट बी’, ‘बिटल्स फॉर सेल’ व इतर प्रसिद्ध अल्बम्सचा यामध्ये सामावेश आहे.

गेली कित्येक वर्षे विविध कारणांमुळे बँडच्या गाण्यांचे हक्क राखून ठेवलेले होते. परंतु आता आॅनलाईन स्ट्रिमिंगच्या माध्यमातून जगभरातील संगीतपे्रमी त्यांच्या गाण्यांचा आनंद लुटू शकणार. संगीतविश्वात मैलाचे दगड त्यांनी रोवला. अशा महान संगीतकारांचे संगीतापासून रसिकांना वंचित ठेवू नये अशी मागणी केली जात असे.
 

Web Title: Bitts song online in the country for the first time online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.