शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

Birthday​ Special : महेंद्र सिंह धोनीचे ‘हे’ रेकॉर्ड्स मोडणे अशक्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2017 14:57 IST

धोनीने आजपर्यंतच्या १३ वर्षात असे काही रेकॉर्ड्स बनविले जे आजपर्यंत कोणत्याच भारतीय क्रिकेटरला जमले नाही.

-Ravindra Moreभारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आज ३६ वर्षाचा झाला. ‘कॅप्टन कूल’ म्हणून प्रसिद्ध धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ मध्ये झाला. धोनीने २३ डिसेंबर, २००४ रोजी क्रिकेट विश्वात पदार्पण केले. धोनीने आजपर्यंतच्या १३ वर्षात असे काही  रेकॉर्ड्स बनविले जे आजपर्यंत कोणत्याच भारतीय क्रिकेटरला जमले नाही. धोनीच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्या रेकॉड्सच्या बाबतीत... * कमालीचा विकेटकीपर  धोनी भारतीय क्रिकेट संघाचा सर्वश्रेष्ट विकेटकीपर आहे. धोनी असा पहिला भारतीय विकेटकीपर आहे ज्याच्या नावे ७३४ बळी ( ५७६ कॅच, १५८ स्टंपिंग्स) आहेत. धोनीच्या पुढे फक्त एडम गिलक्रिस्ट (९०५) आणि मार्क बाउचर (९९८)च आहेत.  * सर्वात जास्त धावसंख्या बनविणारा भारतीय विकेटकीपर  धोनी सर्वात जास्त धावसंख्या बनविणारा भारतीय विकेटकीपर ठरला असून धोनीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय करिअर मध्ये १५ हजार ५८१ धावा केल्या आहेत.  * सर्वश्रेष्ट व्यक्तिगत स्कोर धोनीने आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच श्रीलंकेच्या विरुद्ध १८३ धावा केल्या होत्या. वनडे मध्ये कोणत्याच विकेटकीपर-फलंदाजद्वारा एवढी धावसंख्या झालेली नाही. दुसऱ्या नंबरवर एडम गिलक्रिस्टची धावसंख्या १७२ ची आहे. * सर्वात जास्त षटकार लावणारा भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकुण ३२२ षटकार लावून धोनी या यादीत दुसऱ्या भारतीय फलंदाजांपेक्षा खूपच पुढे आहे. * सर्वात यशस्वी कर्णधार धोनीच्या कॅप्टनशिपमध्ये भारताने ११० वनडे आणि २७ टेस्ट मॅच जिंकले आहेत. दुसऱ्या नंबरवर सौरव गांगुली आहे, ज्याच्या कॅप्टनशिपमध्ये ७६ वनडे आणि २१ टेस्ट मॅच भारताने जिंकले आहेत.   * सर्व आयसीसी टूर्नामेंट जिंकणारा एकमेव कर्णधार भारताने धोनीच्या कॅप्टनशिपमध्ये ५०-५० ओव्हराचा वर्ल्ड कप, टी२० वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅँपियन्स ट्रॉफी जिंकली आहे. असा विक्रम करणारा धोनी हा जगात एकमेव कर्णधार आहे.  * टेस्टमध्ये सर्वोच्च स्कोर आॅस्ट्रेलियाच्या विरोधात टेस्ट मॅचमध्ये २२४ धावा करणारा धोनी एकमेव असा भारतीय विकेटकीपर-फलंदाज आहे.* सर्वात जास्त षटकार लावणारा कर्णधार  धोनीने आपल्या कॅप्टनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० पेक्षा जास्त षटकार लावले आहेत.या यादीत धोनी नंतर आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पोंटिंगने १७१ षटकार आणि न्यूजिलँडचे ब्रैंडन मॅक्कुलमने १७० षटकार लावले आहेत. Source : aajtak