स्वकर्तृत्वाची साक्ष देणारी अन्यन्या बिर्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 03:44 IST
देशातील सर्वात मोठ्या उद्योगघराण्यांपेैकी एका कुटुंबात तुमचा जन्म झालेल्यांपैकी बहुतेक जण फॅमिली बिझनेस जॉईन करतील. मात्र, अन्यना बिर्ला याला अपवाद आहे. बिर्ला उद्योग सहुमात काम करण्याऐवजी तिने स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी स्वयंद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वीही करून दाखविला.
स्वकर्तृत्वाची साक्ष देणारी अन्यन्या बिर्ला
देशातील सर्वात मोठ्या उद्योगघराण्यांपेैकी एका कुटुंबात तुमचा जन्म झालेल्यांपैकी बहुतेक जण फॅमिली बिझनेस जॉईन करतील. मात्र, अन्यना बिर्ला याला अपवाद आहे. बिर्ला उद्योग सहुमात काम करण्याऐवजी तिने स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी स्वयंद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वीही करून दाखविला.‘स्वतंत्र’ नावची मायक्रोफायनान्स कंपनी तिने स्थापन केली आहे. वडील कुमार मंगलम बिर्लांच्या पावलावर पाऊल ठेवून फॅमिली बिझनेसचा सोपा मार्ग सोडून तिने स्वत:ची क्षमता, कौशल्य, बुद्धिमत्ता आणि इच्छाशक्तीचा कस लागेल असा मार्ग निवडला. ती म्हणते, पहिल्यापासूनच मला स्वत:च्या पायावर उभे राहायचे होते. बिर्ला नाव माझ्याशी जोडलेले असल्यामुळे अपेक्षाही तेवढ्याच मोठ्या होत्या. वडिलांकडून व्यावसायाबद्दल नक्कीच मार्गदर्शन घेतले. त्यांचा अनुभव माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला.यंग इंडियामध्ये तरुणांनी स्टार्ट अपकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. मोठ्या उद्योगांशी स्पर्धा करण्याऐवजी त्यांच्या सोबतीने काम करा, असा सल्ला तिने दिला आहे.