शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
4
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
5
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
6
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
7
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
8
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
9
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
10
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
11
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
12
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
13
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
14
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
15
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
16
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
17
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
18
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
19
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
20
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना

विवाहापूर्वी सात वेळा भेटले बिल-मेलिंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:07 IST

सार्वजनिक जीवनात समरस होण्यासाठी मेलिंडा गेट्स यांना वर्षे लागली.

सार्वजनिक जीवनात समरस होण्यासाठी मेलिंडा गेट्स यांना वर्षे लागली. आपले पती आणि जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्याविषयीसुद्धा त्या अतिशय मनमोकळेपणे बोलतात. विवाहापूर्वी एका शनिवारी सकाळी बिल यांनी आपल्याला कसे विविध प्रश्न विचारले आणि आपण त्यांना कसे निरुत्तर केले, याविषयी त्यांनी सांगितले. बिल यांनी मेलिंडा यांना दोन आठवड्याच्या आत एकत्र जेवणासाठी कार्यक्रम आखण्यास सांगितले. यावर मेलिंडा यांनी असे एकाएकी शक्य नसल्याचे सांगितले. पुन्हा कधी योग्य वेळ आल्यास असा कार्यक्रम आखू असे त्यांनी बिल यांना सांगितले. मेलिंडा या मायक्रोसॉफ्टमध्ये प्रॉडक्ट मॅनेजर होत्या तर बिल हे कंपनीचे सीईओ होते. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीमध्ये मेलिंडा यांनी आपल्या भेटीविषयी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, कॉलेजला असताना आमच्या अवतीछवती अतिशय बुद्धिमान विद्यार्थ्यांचे वतरुळ होते. यात मुलींचे प्रमाण फारच कमी होते. माझ्या कल्पनेतील व्यक्तिमत्व मला बिल यांच्यात दिसले. मला त्यांच्याविषयी नितांत आदर होता. त्यामुळे मी आपोआपच त्यांच्याकडे त्यांच्या बुद्धिमत्तेकडे आकर्षित होत गेले. दुसरे म्हणजे त्यांची चौकसवृत्ती. त्यांची विनोदबुद्धीही दाद देण्यासारखी आहे. या सर्व गोष्टींनी मला प्रभावित केले. याला रोमान्स म्हणता येणार नाही. बिल आणि मेलिंडा हे विवाहापूर्वी सात वेळा भेटले. फाऊंडेशनचे काम एकत्र सुरू केल्यावर ते मनाने अधिक जवळ येत गेले. त्यांची अधिक ओळख झाली. बिल म्हणतात, मला नेहमीच सहकार्‍याची गरज भासली आहे. सहकार्‍यासोबत काम करताना मला फार फायदा झाला आहे. मायक्रोसॉफ्टच्या सुरुवातीच्या काळात पॉल अँलेन यांची नवनवीन कल्पनांसाठी मला मदत झाली. नंतर स्टीव्ह बालमेर यांची मदत झाली. त्यांची ओळख महाविद्यालयीन जीवनातच झाली होती. त्यांचाही कंपनीच्या प्रगतीत फार मोठी मदत झाली. अशाच प्रकारची मदत आता मेलिंडा यांच्या रूपात होत आहे.