आठवीत शिकणाऱ्या मुलीचे सुंदर हस्ताक्षर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 20:44 IST
प्रकृति मल्ला असे सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या त्या मुलीचे नाव आहे.
आठवीत शिकणाऱ्या मुलीचे सुंदर हस्ताक्षर
आपले अक्षर हे मोत्यासारखे सुंदर असावे. असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु, अनेकांचे हस्ताक्षर वळणदार नसल्याने, त्याचा कमीपणा नेहमी मनाला टोचत असतो. असेच सुंदर हस्ताक्षर नेपाळ एका आठवीत शिकणाऱ्या मुलीचे आहेत. तिचे केवळ नेपाळ मध्येच कौतुक होत नसून, जगभरातून तिला नावाजले जात आहे. त्यामुळे हल्लीला फेसबुक, ट्विटर, व्हॉटस अॅपवर तिच्या हस्ताक्षराचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.सुरुवातीलाच या मुलीचे हस्ताक्षर पाहिले तर कुणालाही ते टाईप केल्यासारखेच वाटते. तिने ते स्वत: च्या हाताने लिहीलेले आहे अशा विश्वासच बसत नाही. लहानपणापासूनच तिचे हे वळणदार अक्षर आहे. त्यामुळे जगभरात या मुलीच्या हस्ताक्षराची चर्चा होत आहे. केवळ आठवीत शिकणारी ही मुलगी आहे. प्रकृति मल्ला असे त्या मुलीचे नाव आहे.