हिडलस्टनने दिली खराब हवामानाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 16:33 IST
‘अवेंजर्स आणि थॉर’ या मालिकांमध्ये लोकी नावाने लोकप्रिय झालेला अभिनेता टॉम हिडलस्टन सध्या शिकागो न्यूज स्टेशनला पोहचला असून, त्याठिकाणी त्याने सप्ताहातील खराब हवामानाची माहिती दिली आहे.
हिडलस्टनने दिली खराब हवामानाची माहिती
‘अवेंजर्स आणि थॉर’ या मालिकांमध्ये लोकी नावाने लोकप्रिय झालेला अभिनेता टॉम हिडलस्टन सध्या शिकागो न्यूज स्टेशनला पोहचला असून, त्याठिकाणी त्याने सप्ताहातील खराब हवामानाची माहिती दिली आहे. हिडलस्टनने आॅनस्क्रीन भाऊ थॉरवर (क्रिस हेम्सवर्थ) आरोप केला की, त्याचा भाऊ आणि सावत्र आई त्याच्याशी दूरव्यवहार करतात. त्याने भाऊ क्रिस हेम्सवर्थच्या स्वभावाचे उदाहरण देताना हवामानाची माहिती दिली. हिडलस्टनने सांगितले की, क्रिस हेम्सवर्थने हातोडा उचलुन आकाशाकडे भिरकावला, त्यामुळे प्रचंड पाऊस झाला. ‘थॉर राग्नारोक’मध्ये टॉम हिडलस्टन आणि क्रिस हेम्सवर्थ पुन्हा एकदा भावांच्या भूमिकेत दिसणार आहे. जे नेहमीच आपआपसात भांडत असतात. ही मालिका तीन नोव्हेंबर २०१७ मध्ये रिलीज होणार आहे.