आसिफला आॅस्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 03:17 IST
भारतीय वंशाचे ब्रिटिश दिग्दर्शक आसिफ कपाडियाला ब्रिटिश गायिका एमी वाइनहाउसच्या जीवनावर आधारित ‘एमी’ या डॉक्यूमेंट्रीसाठी आॅस्कर अॅवार्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आसिफला आॅस्कर
भारतीय वंशाचे ब्रिटिश दिग्दर्शक आसिफ कपाडियाला ब्रिटिश गायिका एमी वाइनहाउसच्या जीवनावर आधारित ‘एमी’ या डॉक्यूमेंट्रीसाठी आॅस्कर अॅवार्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेत्री डेजी रिडले आणि भारतीय वंशाचा ब्रिटिश अभिनेता देव पटेल यांनी आसिफ यांना पुरस्कार ट्रॉफी प्रदान केली. या अगोदरला आसिफला याच डॉक्युमेट्रीसाठी ‘ग्रॅमी अॅवार्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. शिवाय ‘बाफ्टा’ पुरस्कारासाठी देखील ‘एमी’ या डॉक्यूमेंट्रीला नामांकन मिळाले आहे.