सलमानच्या आई-वडीलांसोबत ऐशने पाहिला ‘हाऊसफुल्ल ३’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 16:50 IST
नुकताच शुक्रवारी रिलीज झालेल्या ‘हाऊसफुल्ल ३’ मध्ये अभिषेक बच्चनची भूमिका आहे.
सलमानच्या आई-वडीलांसोबत ऐशने पाहिला ‘हाऊसफुल्ल ३’
नुकताच शुक्रवारी रिलीज झालेल्या ‘हाऊसफुल्ल ३’ मध्ये अभिषेक बच्चनची भूमिका आहे. म्हणून ऐश्वर्या हा सिनेमा पाहण्यासाठी पोहचली होती. विशेष म्हणजे ऐशसोबत सलमानचे आई-वडीलदेखील होते. काही दिवसांपूर्वीच सलमान खानचे पिता सलीम खान यांनी ऐश्वर्या राय-बच्चनचं भरपूर कौतूक केलं होतं. शुक्रवारी हाऊसफूल ३ सिनेमा रिलीज झाला. त्यामुळे सेलिब्रिटींसाठी स्पेशल शो ठेवण्यात आला होता. यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सलमान खानचे वडील सलीम खान आणि आई हेलन देखील यासाठी पोहोचले होते.या शोमध्ये सलमान खानचे आई-वडील आणि ऐश्वर्या सोबत होते. त्या दोघांनी ही एकमेकांकडे दुर्लक्ष केलं नाही. एका वेबसाईटच्या माहितीनुसार त्यांनी एकत्र सिनेमा पाहिला आणि खूप गप्पा देखील मारल्या.