शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

सुंदर दिसण्यासाठी करा बर्फानं मसाज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 20:42 IST

सुंदर दिसण्यासाठी आपण निरनिराळी कॉस्मेटिक्स वापरून बघतो. पण आपल्या फ्रीजमध्ये कायम ठेवलेल्या बर्फाच्या खड्याकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं. एक बर्फाचा खडा आणि त्यानं पाच ते सात मीनिटं चेहे-यामसाज केल्यास सौंदर्याची कळी खुलतेच.

ठळक मुद्दे* चेह-यावर आइसक्यूबनं मसाज केल्यानं चेह-याच्या त्वचेवर ग्लो येतो.* बर्फाच्या खड्यानं चेह-यावर मसाज केल्यानं त्वचेची रंध्र मोकळी होतात आणि कांती नितळ होण्यास मदत होते.* बर्फाच्या खड्यानं चेह-यावर मसाज केल्यानं त्वचेची रंध्र मोकळी होतात आणि कांती नितळ होण्यास मदत होते.* पुटकुळ्या, मुरूमं घालवण्यासाठी बर्फाचा छानच फायदा होतो.* सनबर्नवरही बर्फफायदेशीर आहे.

 

- मोहिनी घारपुरे-देशमुखएरवी आपली शीतपेयं गारेगार करण्यासाठी वापरला जाणारा बर्फसौंदर्याच्या दुनियेतही फार महत्त्वाची भूमिका बजावतो. एखाद्या मुक्यामारावर डॉक्टर बर्फानं शेकायला सांगतात, उपचारासाठी बर्फाचा वापर हा एवढाच आपल्याला माहित. मात्र यापलिकडेही बर्फाचे खूप उपयोग आहेत.सुंदर दिसण्यासाठी बर्फाचा मसाज याविषयी वाचलं तर तुम्हाल त्याची नक्की खात्री पटेल.सुंदर करणारे आइस मसाज1. आइस मसाज  यासाठी आइसक्यूब्स घ्या आणि ते त्वचेवर हळूवारपणे किमान पाच सात मीनिटांसाठी फिरवत राहा. विशेषत: चेह-यावर आइसक्यूबनं मसाज केल्यानं चेह-याच्या त्वचेवर ग्लो येतो.2. मेकअपपूर्वी मसाज - एखाद्या मोठ्या समारंभात जायचं असेल किंवा जर तुम्ही टीव्ही किंवा नाटकातील कलाकार असाल तर तुम्हाला चेह-यावर अनेकदा भरपूर मेकअप चढवावा लागतो. त्यामुळे त्वचेची रंध्र मोकळी रहात नाहीत.आणि त्यामुळे कालांतरानं चेह-याच्या त्वचेला खूप हानी पोचते. म्हणूनच प्रत्येकवेळी मेकअप चढवण्यापूर्वी आनि मेकअप उतरवल्यानंतर बर्फाच्या खड्यानं चेह-यावर मसाज करावा. यामुळे त्वचेची रंध्र मोकळी होतात आणि कांती नितळ होण्यास मदत होते. तसेच चेह-याची त्वचा सतत छेडली गेल्यानं लालसर होते ती लालीही बर्फाच्या खड्यानं मसाज केल्यानं कमी होण्यास मदत होते.3. आयब्रोजला मसाज - आयब्रोज किंवा अप्परलिप्स करताना अनेकजणींना खूपच त्रास होतो. त्यामुळे प्लकर वगैरेचा उपयोगही काहीजणी करतात. ब्यूटी थेरपिस्टच्या मते, प्लकींग करण्यापूर्वी त्या जागी जर बर्फाच्या खड्यानं काही मीनिटें मसाज केला तर प्लकींगच्या वेळी वेदना होत नाहीत. तसेच त्यानंतर त्वचेवर येणारी लालीही कमी प्रमाणात येत असल्याचे दिसतं.

 

4. पुटकुळ्या, मुरूमं घालवण्यासाठी बर्फाचा छानच फायदा होतो. जर तुमच्या चेह-यावर मुरूमं, पुटकुळ्या येत असतील आणि त्या फुटून तिथली जागा लाल होत असेल तर तुम्ही एका मऊ, तलम कपड्यात तीन चार बर्फाचे खडे घ्या आणि त्यानं चेह-याच्या लाल झालेल्या जागी दोन तीन मीनिटं मसाज करा. सलग मसाज करू नका, त्याऐवजी मध्येमध्ये काही मीनिटं थांबा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा दिसेल. फक्त त्यासाठी थोडा धीर धरावा लागेल.5. सनबर्नवरही बर्फफायदेशीर आहे. सनबर्न अर्थात उन्हामुळे त्वचेवर झालेल्या जखमा, काळी पडलेली त्वचा या सगळ्यावर बर्फाचा मसाज हे चांगलं उत्तर आहे. यामुळे सनबर्नची वेदना नक्कीच कमी होते. तसेच जळजळणा-या भागाला थंडावा मिळून आराम वाटतो.6. डोळ्यांना सूज येत असल्यास, डोळे लाल होत असल्यास, दररोज एक बर्फाचा खडा डोळ्यांवर चोळा. यामुळे डोळ्यांना थंडावा वाटेल आणिसूज वगैरे असेल तर कमी होण्यास मदतच होईल.