अमालला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 03:25 IST
हॉलीवुड अभिनेता जॉर्ज क्लूनीची पत्नी अधिवक्ता अमाल हिला धमकी मिळाल्याने तिच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
अमालला धमकी
हॉलीवुड अभिनेता जॉर्ज क्लूनीची पत्नी अधिवक्ता अमाल हिला धमकी मिळाल्याने तिच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. क्लूनीने त्याचे दक्षिण इंग्लंड येथील बर्फ शायर काउंटी येथील घराच्या सुरक्षेत कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दोघांनाही बॉडीगार्डशिवाय घराबाहेर पडू नये असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. या घराच्या किंमत १.०७ करोड डॉलर असून, सुरक्षेच्यादृष्टीने येथे सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अमालला गेल्या काही दिवसांपासून फोनवर धमकी दिली जात आहे. शिवाय तिला धमकीचे मॅसेजही येत आहेत. सुत्रानुसार तिला या धमक्या मालदीवचे माजी राष्टÑपती मोहम्मद नशीद प्रकरणामुळे येत आहेत. यावेळी पॉल हॅरिसनने सांगितले की, क्लूनीला जेवढी सुरक्षा आहे, त्यापेक्षा अधिक सुरक्षा अमालला देण्यात आली आहे.