एकाच पोस्टरमध्ये अमेरिकेचे सर्व हवाईदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 22:42 IST
ग्राफिक डिझायनर्सने अमेरिकेच्या हवाईदलात असणारे सर्व प्रकारची लढाऊ विमानांचे एका विशाल पोस्टरवर चित्रांकन केले आहे.
एकाच पोस्टरमध्ये अमेरिकेचे सर्व हवाईदल
संपूर्ण जगातील सर्वात शक्तीशाली देश म्हणजे अमेरिका. त्यांची मिलिटरी पॉवर किती अवाढव्य आहे की, हे काही वेगळे सांगणे नको. अतिअत्याधुनिक हवाईदल हे अमेरिकेची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.पण प्रत्यक्षात किती मोठे हवाईदल आहे अमेरिकेचे?याची कल्पना तुम्हाला पुढील पोस्टर पाहून नक्कीच येईल. ‘कंटेम्पररी इश्यूज अँड जिओग्राफी’च्या ग्राफिक डिझायनर्सने अमेरिकेच्या हवाईदलात असणारे सर्व प्रकारची लढाऊ विमानांचे एका विशाल पोस्टरवर चित्रांकन केले आहे.सहा गटांमध्ये ही विमाने विभागण्यात आली आहेत. यापूर्वीच कंपनीने अमेरिकेच्या नौदलातील विमांनाचे अशाच प्रकारचे पोस्टर्स विक्रीस उपलब्ध केलेली आहेत. लवकरच हवाईदलाचे पोस्टर्सदेखील विक्री करण्यात येणार आहेत.