शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Alert : ​आॅनलाइन अफेयरमुळे वैवाहिक आयुष्य धोक्यात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 17:11 IST

चॅटिंग करणे, मेसेज पाठवणे हे हार्मलेस आहे असा युक्तिवाद काही जण करतात. मात्र वरकरणी हार्मलेस वाटणाऱ्या या प्रकाराचे दुष्परिणाम अनेक आहेत.

सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढतच असून त्याचा परिणाम आपल्या खाजगी आयुष्यावर जाणवायला लागला आहे. विशेष म्हणजे काही चित्रपटांमध्येही याचे धोके दाखविण्यात आले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणास जरी तात्पूरता आनंद मिळतो मात्र यांचे भयंकर परिणाम होत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यात घटस्फोट तर होतोच शिवाय मानसिक परिणामही होतात. शिवाय अस्वस्थता, चिंता, डिप्रेशन, तीव्र दु:खांचा आवेग, असोशी, बदल्याची भावना असे परिणाम कमी अधिक प्रमाणात दोघांवरही दिसून येतात. त्याऐवजी एकमेकांशी संवाद साधणं, एकमेकांना वेळ देणं याला प्राधान्य द्यायला हवं. असे केल्यास वैवाहिक आयुष्याचा खरा आनंद मिळू शकातो. चॅटिंग करणे, मेसेज पाठवणे हे हार्मलेस आहे असा युक्तिवाद काही जण करतात.  मात्र वरकरणी हार्मलेस  वाटणाऱ्या या प्रकाराचे दुष्परिणाम अनेक आहेत.बऱ्याचजणांना आॅनलाइन चॅटिंग करुन आपल्या पार्टनरची फसवणूक करण्याचे थ्रिल वाटते. विशेष म्हणजे असा प्रकार करत असताना व्यक्ती ही कॉम्पुटरच्या मागे सुरक्षित असते त्यामुळे तिच्यात एक फाजील धाडस आलेलं असतं. ‘इतर जे करतात ते मीही करू शकतो. मला कोणी पकडू शकत नाही’ अशी भावना निर्माण होते. ज्यांच्यात व्हर्च्युअल करेज-धाडस निर्माण होतं ते असे प्रकार करतात; पण हे खर धाडस नाही. याच्यातून आपले वैवाहिक आयुष्य धोक्यात येऊ शकते. सायबर चीटिंग हे व्हर्च्युअल  वर्ल्डमध्येच होतं आणि यात जे भावनिकरीत्या गुंतलेले असतात त्यांना स्वत:च वागणं चुकीचं, अप्रामाणिक वाटत नाही.‘मी काही कोणाला प्रत्यक्षात बघत नाही किंवा सोअर्स करत नाही ती फसवणूक कशी होईल’, असा युक्तिवाद ते करतात. विशेष म्हणजे ती फसवणूकच असते. जर दोन व्यक्तींचं नातं कसं असावं याचे काही नियम असतील तर ते सायबरवरही पाळायला हवेत. वास्तव आणि आभासी अशी आपल्या जीवनाची विभागणी झालेली नाही. तुमची निष्ठा हि सगळीकडे असायला हवी. माणसाचं व्यक्तिमत्व हे संमिश्र आहे. त्यामुळे फसवणूक चुकीचीच आहे. आजकाल पती -पत्नी किंवा पार्टनर्स  हे बरेचदा आॅनलाइन बिझी असल्याने एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यातून त्याचा भावनिक संपर्क तुटतो. याचा परिणाम नात्यावर होतो.  स्वत:च्या पार्टनरमध्ये भावनिकरीत्या गुंतलेले का नाहीत हा खरा प्रश्न आहे. जर केअच नात्यात तुम्ही मनाने गुंतलात तर आॅनलाईन भटकंतीची गरजच भासणार नाही. आॅनलाईन  चीटिंगचे परिणाम भयंकर आहेत.  घटस्फोट तर होतोच शिवाय मानसिक परिणामही होतात. शिवाय अस्वस्थता , चिंता, डिप्रेशन, तीव्र दु:खांचा आवेग, असोशी, बदल्याची भावना असे परिणाम कमी अधिक प्रमाणात दोघांवरही दिसून येतात. एकमेकांशी संवाद साधणं, एकमेकांना वेळ देणं याला प्राधान्य द्यायला हवं.