शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

ALERT : सावधान! मोफत वाय फाय वापरताय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 18:12 IST

मोफत वाय-फायच्या ठिकाणी तुमचा वैयक्तिक डेटा चोरून घेण्यासाठी अनेक गुन्हेगार बसलेले असतात. त्यामुळे या मोफत वाय-फायच्या सुविधेमुळे सायबर क्राईमची शक्यता अधिक वाढते.

-Ravindra Moreआज प्रत्येकाच्या आयुष्यात इंटरनेट हा अविभाज्य घटक बनला आहे. त्यासाठी कुठेही गेल्यावर इंटरनेट उपलब्ध आहे का याचा शोध सगळे घेतात. आजकाल  कॅफे, मॉल, हॉटेल व इतर सार्वजनिक ठिकाणी बहुधा मोफत वाय-फाय उपलब्ध असते. म्हणून दिवसेंदिवस इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढत आहे. मात्र अशा मोफत वाय-फायच्या ठिकाणी तुमचा वैयक्तिक डेटा चोरून घेण्यासाठी अनेक गुन्हेगार बसलेले असतात. त्यामुळे या मोफत वाय-फायच्या सुविधेमुळे सायबर क्राईमची शक्यता अधिक वाढते. मोफत वाय-फाय वापरताना काय काळजी घ्याल*नाव व्यवस्थित तपासामूळ नेटवर्कच्या नावानेच स्वत:चे नाव ठेवून वाय-फाय वापरणाºयांना हॅकर्स मोफत वाय-फाय झोनमध्ये वापरकर्त्यांना मूर्ख बनवतात. अशावेळी जर हॅकरच्या नेटवर्कशी तुम्ही कनेक्ट झालात तर तुमचा वैयक्तिक डेटा हॅकरला सहज मिळू शकतो. * मोबाइल किंवा लॅपटॉपचा पासवर्ड रिसेट करू नका मोफत वायफाय झोनमध्ये पासवर्ड रिसेट करु नका कारण असे केल्याने आपला पासवर्ड हॅकर्स सहज मिळवू शकता यामुळे असे करणे धोक्याचे ठरू शकते.* शेअरिंग आॅफ करा मोफत वायफाय वापरताना फोन किंवा लॅपटॉपचे शेअरिंग आॅन राहिल्यास सायबर गुन्हेगार तुमच्या पर्यंत सहज पोहोचू शकतील. यासाठी आपल्या फोन किंवा लॅपटॉपचे शेअरिंग आॅफ करा. यामुळे सायबर गुन्हेगार तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. इंटरनेट वापरून झाल्यावर फॉरगेट नेटवर्क अवश्य करा. अन्यथा पुन्हा रेंजमध्ये आल्यावर हे पुन्हा कनेक्ट होईल. * वापर झाल्यानंतर लॉगआऊट करायला विसरू नका तुम्ही सर्व अकाउंटमधून लॉगआऊट झालाय हे निश्चित करून घ्या. तसे केले नाही तर सायबर धोका होऊ शकतो. इंटरनेटचा वापर झाला की लॉगआऊट करा. * व्हीपीएन वापरा सुरक्षित इंटरनेट वापरण्यासाठी व्हीपीएन इन्स्टॉल करा. व्हीपीएन म्हणजे व्हर्च्युअल प्लेस नेटवर्क. यामुळे तुम्ही सुरक्षित इंटरनेट वापरू शकता. हे इन्स्टॉल केल्यामुळे मोफत वाय-फाय झोनमधील सायबर क्राईमपासून आपल्या फोनला वाचवता येते.