मोहिनी घारपुरे-देशमुख
समर हॉट सीझनमध्ये घराबाहेर पडताना उकाड्यानं जीव हैराण होणार नाही असेच कपडे निवडले जातात. अशाच कपड्यांपैकी एक अत्यंत लोकिप्रय आणि महिलावर्गासाठी अत्यंत कम्फर्टेबल स्टायलिश अटायर म्हणजे क्युलोट्स आणि त्यावर कूलसा टॉप. क्युलोट्स म्हणजे थ्रीफोर्थ उंचीच्या ढगळ पँट्स. या पँट्स दुरून पाहताना स्कर्टसारख्या दिसतात. परंतु प्रत्यक्षात त्यांचा लूक फारच निराळा असतो.अनेकदा केप्रिज आणि क्युलोट्स सारख्याच असल्याची गल्लत केली जाते परंतु दोन्हीमध्ये फारच फरक आहे. काहीशा ढगळ आणि पायाच्या घोट्यापर्यंतच्या या पँट्स (ट्राऊझर्स) अत्यंत आरामदायी आणि फॅशनेबल दिसतात. किंबहुना यंदा या सीझनमध्ये इंटरनॅशनल रँपवरही या क्युलोट्स झळकल्या आहेत. मात्र क्युलोट्स घालताना विशेष काळजी घेतली पाहिजे अन्यथा ‘फॅशन डिझास्टर’ व्हायला काहीच वेळ लागणार नाही.
क्यूलोटस घालताना* फॉर्मल लूक हवा असेल तर क्र ीम कलरची सिल्कची क्युलोटस निवडा आणि त्यावर एखादा शर्ट आणि जॅकेट घाला.* स्पोर्टी लूक हवा असेल तर क्युलोट्सवर टीशर्ट आणि स्नीकर्स घाला* तुमच्याकडे जर बोल्ड प्रिंट किंवा पॅटर्नची क्युलोटस असेल तर त्यावर न्यूट्रल शेडचा टॉप घाला. विशेषत: पांढरा, काळा किंवा हलका पीच कलरचा टॉप शोभून दिसेल. जर दोन्हीही टॉप आणि बॉटम भडक रंगाचे घातलेत तर एकंदरीतच लूक बटबटीत होईल. *क्युलोट्स घालून तुम्ही आॅफीसलाही जाऊ शकता. फक्त त्याचा फॉर्मल लुक तुम्हाला योग्य त्या अँक्सेसरीज घालून मेण्टेन करावा लागेल. उदा. एखादा स्लीम बेल्ट, गॉगल, एखादं फॉर्मल बेल्टवालं घड्याळही मनगटावर शोभून दिसेल.* क्युलोट्स ही साधारणत: थ्रीफोर्थ उंचीची आणि ढगळ ट्राऊझर असल्यानं त्याबरोबर शूज किंवा चप्पल घातल्यानं एकदम शॅबी लूक येऊ शकतो. त्यामुळे नाजूकशा उंच टाचांच्या सँडल्सच त्यावर शोभून दिसतात.