‘फ्रेंडशिप पॅराडॉक्स’चा अजब फंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 20:23 IST
फ्रेंडशिप पॅराडॉक्स’ हे कारण आहे की, तुमचे मित्र सोशल मीडियावर तुमच्यापेक्षा जास्त पॉप्युलर असतात.
‘फ्रेंडशिप पॅराडॉक्स’चा अजब फंडा
तुम्हाला असं कधी वाटते का की, तुमच्या पोस्ट/फोटोला तुमच्या इतर मित्रांपेक्षा कमी लाईक मिळतात.तुमच्यापेक्षा तुमचे मित्र अधिक लोकप्रिय आहेत. तसे जर असेल, असे वाटणे काही गैर नाही.कारण यामागे वैज्ञानिक कारण आहे. ते कारण म्हणजे ‘फ्रेंडशिप पॅराडॉक्स’.हेच कारण आहे की, जिममध्ये तुम्हाला इतर लोक जास्त फिट वाटतात. हेच कारण आहे की, तुमचे मित्र सोशल मीडियावर तुमच्यापेक्षा जास्त पॉप्युलर असतात.ट्विटरवर त्यांना तुमच्यापेक्षा जास्त लोक फॉलो करतात. या पॅराडॉक्सनुसार लोकांना त्यांच्या मित्रांपेक्षा सरासरी कमी मित्र असतात. आपल्यापेक्षा मित्राला जास्त मित्र कसे असू शकतात असा प्रश्न पडला? उत्तर सोप्पं आहे. ज्या लोकांचा मित्रपरिवार मोठा असतो तेच लोक आपले मित्र होण्याची शक्यता अधिक असते. याचा अर्थ की, ज्या लोकांना कमी मित्र असतात, ते तुमचे मित्र असण्याची शक्यता त्यातुलनेत कमी असते. ‘पीएलओएस वन’ जर्नलमध्ये याविषयी शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे.‘फ्रेंडशिप पॅराडॉक्स’मुळेच जिममधील इतर सदस्य आपल्यापेक्षा जास्त चांगल्या शेपमध्ये आहे असे वाटते. तसेच आपण ज्या वेळी हॉटेल किंवा मॉलमध्ये जातो तेव्हाच जास्त गर्दी असते. बघा कसाला अजब ‘विरोधाभास’ आहे.