७.८ मिलियन डॉलर्सचा बंपर बोनस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 08:10 IST
सत्य नडेला यांनी मायक्रोसॉफ्टची सूत्रे हाती घेतल्यापासून कंपनीच्या व्यवसायात मोठी उलाढाल झाली आहे. ...
७.८ मिलियन डॉलर्सचा बंपर बोनस
यासाठी त्यांनी काही निवडक व्यक्तींना कंपनीसोबत जोडून घेतले आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे जॉन्सन. जॉन्सन यांनी सॅनडिअँगो स्थित क्वालकॉम कंपनीमध्ये २४ वर्षे काम केल्यानंतर मायक्रोसॉफ्टमध्ये बिझनेस डेव्हलपमेंटच्या उपाध्यक्षा म्हणून ऑफर स्वीकारली. मात्र यासाठी नडेलांना जॉन्सनला एक दमदार ऑफर द्यावी लागली.जॉन्सन यांना जॉब स्वीकारताना ७.८ मिलियन डॉलर्सचा (४५ कोटी रुपये) साईनिंग बोनस देण्यात आला. त्यामुळे २0१५ मध्ये त्यांची सॅलरी १४.५३ मिलियन डॉलर्स इतकी झाली. डिसेंबर महिन्यात होणार्या शेअरहोल्डर्स मिटिंगच्या आधी बाहेर पडलेल्या एका प्रॉक्सी बॅलन्स शीटमधून ही माहिती मिळाली.नडेला नंतर जॉन्सन आता मायक्रोसॉफ्टमध्ये सर्वात जास्त सॅलरीच्या यादीत दुसर्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या नंतर केविन टर्नर (१२.२ मिलियन डॉलर्स) हे तिसर्या नंबरवर आहेत.