"26 January" Greetings & Messages 2017: काही स्पेशल मेसेजेस तुमच्या खास व्यक्तींसाठी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 13:37 IST
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना आपण फोन किंवा एसएमएस किंवा वॉटस अॅपच्याव्दारे शुभेच्छा देतो.
26 January Greetings & Messages 2017: काही स्पेशल मेसेजेस तुमच्या खास व्यक्तींसाठी !
-Ravindra More२६ जानेवारी रोजी संपूर्ण भारतात ‘प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त करतात. त्यातच सध्या आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना आपण फोन किंवा एसएमएस किंवा वॉटस अॅपच्याव्दारे शुभेच्छा देतो. असेच काही स्पेशल मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी.असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी,अनेकांनी केले बलिदान...वंदन तयांसी करुनीया आजगाऊ भारतमातेचे गुणगाण...!प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! उत्सव तीन रंगांचा,आभाळी आज सजला,नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,ज्यानी भारत देश घडविलाभारत देशाला मानाचा मुजरा!प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,तरी सारे भारतीय एक आहेतप्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा...प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!