शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

Fact Check: OLA, Uber ला टक्कर देत 'TATA' ने 'Cab-E' सुरू केलेली नाही; 'तो' मेसेज चुकीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 14:48 IST

Tata कंपनीनंही Cab E नावानं मुंबई आणि पुण्यात टॅक्सी सेवा देण्यास सुरुवात केल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

आपल्या सोयीनुसार आणि  एका क्लिकवर टॅक्सी बुक करण्याची सेवा Ola आणि Uber कंपन्यांनी उपलब्ध करुन दिली. त्यास देशात मोठा प्रतिसादही मिळाला. याच कंपन्यांना आता टक्कर देण्यासाठी देशातील प्रतिष्ठीत Tata कंपनीनंही Cab E नावानं मुंबई आणि पुण्यात टॅक्सी सेवा देण्यास सुरुवात केल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या मेसेजचं सत्य जाणून घेण्याचा 'लोकमत'नं प्रयत्न केला असता संबंधित मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा चुकीचा असल्याचं निष्पन्न झालं आहे. 

दावा काय?देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा उद्योग समूहानं मुंबई आणि पुण्यात Cab E नावानं टॅक्सी सेवा देणारी कंपनी सुरू केली असून ओला आणि उबर सेवेपेक्षा चांगला पर्याय देण्याचा टाटांनी प्रयत्न केला आहे. रतन टाटा नेहमीच देशवासियांना कठीण काळात मदत करत आले आहेत. त्यामुळे या सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा आणि मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा, असं आवाहन करणारा एक मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होत आहे. यासोबत Cab E च्या App ची डाऊनलोड लिंक देखील देण्यात आली आहे. 

कशी केली पडताळणी?व्हॉट्सअ‍ॅपवर ज्या Cab E नावानं मेसेज व्हायरल झाला आहे. त्याच कंपनीचं अधिकृत संकेतस्थळ https://www.cabecars.in/ उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर कंपनीची संपूर्ण माहिती about सेक्शनमध्ये देण्यात आली आहे. यातील माहितीनुसार CAB-EEZ Infra Tech (P) Limited (Brand Name: “Cab-e”) ही स्वतंत्र कंपनी असून या कंपनीचा Tata या कंपनीशी कोणताही संबंध असल्याचं येथे नमूद करण्यात आलेलं नाही. 

संकेतस्थळावर कंपनीच्या संस्थापकांचीही माहिती देण्यात आली आहे. https://www.cabecars.in/OurTeam/ येथे देण्यात आलेल्या माहितीनुसार कुलदीप घोष हे कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत. तर इंद्रनील चक्रवर्ती हे सहसंस्थापक, सीओओ आणि सीएचआरओ आहेत. तसंच नितीन शर्मा हे कंपनीचे सहसंस्थापक आणि सीएफओ पदावर कार्यरत आहेत. येथे रतन टाटा किंवा त्यांच्या कंपनीशी निगडीत कोणत्याही सदस्याचा समावेश नसल्याचं आढळून आलं. 

Cab-E कंपनीचं फेसबुकवरही पेज उपलब्ध आहे. त्यावर कंपनीनं स्वत: त्यांच्या नावानं व्हायरल होत असलेल्या मेसेजवर सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. यात Cab-E कंपनी ही एक खासगी संस्था असून टाटा कंपनीचा यात कोणताही सहभाग नाही असं स्पष्ट केलं आहे.Cab-E कंपनीनं दिलेलं स्पष्टीकरण- https://bit.ly/3tT7nyr

महत्वाची बाब अशी की टाटा मोटर्सच्या टीमशी 'लोकमत डॉट कॉम'ने संपर्क साधला असता, हा मेसेज पूर्णपणे चुकीचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

निष्कर्ष: Cab E नावानं इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा देणाऱ्या खासगी कंपनीचा टाटा कंपनीशी कोणताही संबंध नाही. 

टॅग्स :TataटाटाOlaओलाUberउबर