शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Fact Check: मतदानापूर्वी दिल्लीत इंडिया आघाडीबाबतचा व्हायरल झालेला व्हिडीओ खोटा; जाणून घ्या सत्य काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 18:15 IST

देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Created By: News Checker

Translated By: ऑनलाइन लोकमत

देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दरम्यान, न्यूज 24 आणि 'आज तक'चे दोन कथित व्हिडीओ व्हायरल होत आहेत, यामध्ये इंडिया आघाडीला आघाडी मिळत असल्याचे दाखवले जात आहे आणि इंडिया अलायन्सचे उमेदवार महाबल मिश्रा यांना पश्चिमेतून आघाडी घेताना दाखवले जात आहे. 

दरम्यान,  आम्ही केलेल्या रिसर्समध्ये आम्हाला आढळले की दोन्ही व्हिडीओ एडिट केले आहेत. दोन्ही व्हिडिओंमध्ये स्वतंत्र एआय जनरेट केलेला ऑडिओ जोडण्यात आला आहे. 

२५ मे रोजी दिल्लीतील सातही लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. भाजपने सातही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. इंडिया अलायन्सच्या वतीने आम आदमी पक्षाने चार जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत तर काँग्रेसने तीन जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत या सातही जागेवर भाजपाने विजय मिळवला आहे.न्यूज 24 च्या व्हायरल व्हिडीओमध्ये, दिल्लीतील लोकसभेच्या ७ पैकी ६ जागांवर इंडिया अलायन्सची आघाडी असल्याचा अंदाज आहे.

व्हायरल होत असलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये टीव्ही चॅनल न्यूज 24 चा लोगो आणि त्यांचे अँकर मानक गुप्ता दिसत आहेत. व्हिडिओमध्ये मानक गुप्ता असे सांगताना दिसत आहेत की, “यावेळी दिल्लीतील लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा आघाडी घेत असताना दिसत आहे. टुडे चाणक्य ओपिनियन पोलनुसार, दिल्लीतील एकूण सात जागांपैकी सहा जागा इंडिया अलायन्सकडे जाताना दिसत आहेत. पश्चिम दिल्लीतून महाबल मिश्रा भक्कम स्थितीत दिसत आहेत. या जागेवर ५८% मतं इंडिया आघाडीच्या महाबळ मिश्रा यांच्याकडे जात आहेत. तर ३९% मते इंडिया आघाडीला आणि २% मते इतरांना जातील असे दिसते.

'आज तक'च्या व्हायरल व्हिडिओमध्ये पश्चिम दिल्ली लोकसभेत इंडिया आघाडीची आघाडी दिसत आहे.

दुसरा व्हिडीओ 'आज तक' टीव्ही चॅनलचा आहे, यामध्ये सुधीर चौधरी अँकरिंग करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सुधीर चौधरी हे सांगतात की, “पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार महाबल मिश्रा सर्वेक्षणात भाजपचे उमेदवार कमलजीत सेहरावत यांच्यापेक्षा खूप पुढे आहेत. याशिवाय स्क्रीनवर दाखवलेल्या एक्झिट पोलमध्ये इंडिया अलायन्सला पाच तर भाजपला दोन जागा देण्यात आल्या आहेत.

 

फॅक्ट चेक

न्यूजचेकरने पहिल्यांदा न्यूज 24 च्या व्हिडिओ तपासला. या दरम्यान, व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिला तेव्हा  आढळले की त्यांनी दाखवलेला दिवस शुक्रवार असा लिहिलेला आहे आणि वेळ ०४:५९ च्या आसपास लिहिली आहे.

आता आम्ही न्यूज 24 चे अँकर मानक गुप्ता यांच्या वेगवेगळ्या शोचे व्हिडीओ पाहिले. यादरम्यान, आम्हाला न्यूज 24 च्या फेसबुक पेजवरून २९ मार्च रोजी लाईव्ह करण्यात आलेल्या 'राष्ट्र की बात' कार्यक्रमाचा व्हिडीओ मिळाला. या कार्यक्रमात इंडिया आघाडीच्या दोन राज्यात निश्चित झालेल्या जागांवर चर्चा करण्यात आली.

 

यादरम्यान, आम्ही या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झालेल्या व्हिडिओशी जुळवला तेव्हा आम्हाला दिसले की दोन्ही व्हिडीओमध्ये साम्य आहे. माणक गुप्ता यांनी दोन्ही व्हिडिओंमध्ये एकच ड्रेस परिधान केला आहे. याशिवाय, दोन्ही व्हिडिओंमध्ये व्हिडीओ रिलीजचा दिवस शुक्रवार आहे आणि वेळ वरील उजव्या बाजूला ०४:५९ लिहिली आहे.

वास्तविक व्हिडिओच्या सुरुवातीला तांत्रिक कारणांमुळे माणक गुप्ता यांचा आवाज ऐकू येत नसला तरी जाहिरात ऐकू येते. मात्र, यादरम्यान मानक यांचे बोलण्याचे हावभाव दोन्ही व्हिडिओंमध्ये सारखेच आहेत.

आमच्या आतापर्यंतच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, हा व्हायरल व्हिडीओ एडिट केला आहे. आता आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की व्हायरल व्हिडिओमध्ये उपस्थित असलेला ऑडिओ AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. यासाठी, आम्ही 'मिसइन्फॉर्मेशन कॉम्बॅट अलायन्स' च्या डीपफेक ॲनालिसिस युनिटशी संपर्क साधला, याचा न्यूजचेकर देखील एक भाग आहे.

डीपफेक ॲनालिसिस युनिटने AI डिटेक्टर्स TrueMedia आणि HIVE AI च्या मदतीने या व्हिडिओचे परीक्षण केले आणि आढळले की हा ऑडिओ मोठ्या प्रमाणात AI द्वारे तयार झाला आहे. त्यांचे परिणाम खाली पाहिले जाऊ शकतात.

आता आम्ही माणक गुप्ता यांच्याशीही संपर्क साधला. त्यांनी हा व्हिडीओ फेक असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, आम्हाला माणक गुप्ता यांनी २४ मे २०२४ रोजी केलेले ट्विट देखील आढळले, यामध्ये त्यांनी व्हायरल व्हिडीओ बनावट आणि डीपफेक असल्याचे सांगितले होते.

इंडिया आघाडीला पाच जागा देणारा Aaj Tak च्या व्हिडिओची तपासणी

यानंतर आम्ही सुधीर चौधरी यांच्या व्हिडिओचीही तपासणी केली. यावेळी, जेव्हा आम्ही व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला तेव्हा आढळले की, पहिल्या काही सेकंदांनंतर व्हिडिओमधून आज तक लोगो काढून टाकला आहे, तर सहसा आज तक व्हिडिओंमध्ये असे घडत नाही.

संबंधित कीवर्डच्या मदतीने गुगल सर्च केल्यानंतर, 'आज तक'च्या वेबसाइटवर असा कोणताही अहवाल आम्हाला आढळला नाही यामध्ये इंडिया टुडेने दिल्लीतील एकूण सात जागांपैकी पाच जागा इंडिया अलायन्सला आपल्या एक्झिट पोलमध्ये दिल्या आहेत.

व्हायरल व्हिडिओची कीफ्रेम रिव्हर्स इमेज शोधताना, आम्हाला आज तकच्या YouTube चॅनेलवर १६ मे २०२४ रोजी अपलोड केलेला व्हिडीओ आढळला. या व्हिडिओच्या सुरुवातीच्या सेकंदांचे व्हिज्युअल जवळपास व्हायरल व्हिडिओशी जुळणारे होते.

मूळ व्हिडिओमध्ये, सुधीर चौधरी त्यांच्या ब्लॅक अँड व्हाईट कार्यक्रमात स्वाती मालीवाल यांच्यासोबत १३ मे रोजी दिल्लीतील मुख्यमंत्री हाऊसमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेबद्दल बोलत होते.

आता आम्ही हा व्हिडीओ डीपफेक ॲनालिसिस युनिटलाही पाठवला आणि त्यांनी ट्रूमीडिया आणि हायव्ह एआयच्या मदतीने तो तपासला. TrueMedia ला या व्हिडिओमध्ये AI जनरेट केलेला ऑडिओ सापडला आहे. याशिवाय, Hive AI ने व्हिडिओच्या काही भागांमध्ये AI जनरेट केलेला ऑडिओ देखील शोधला.

 

आम्ही आमच्या तपासादरम्यान इंडिया टुडे आणि सुधीर चौधरी यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांनी प्रतिसाद दिल्यावर स्टोरी अपडेट करू.

निष्कर्ष

दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी व्हायरल होणारे हे दोन्ही व्हिडीओ बनावट असल्याचे आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे.

Result: Altered Media

(सदर फॅक्ट चेक News Checker या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४