शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

Fact Check: टाटा मोटर्सने पुन्हा नॅनो कार लॉन्च करण्याची घोषणा केली? व्हायरल फोटो एडिट केलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 12:22 IST

Fact Check: टाटा नॅनो ही कार जरी बंद झालेली असली तरी ती पुन्हा नोएल टाटा यांच्या नेतृत्वाखाली लाँच केली जाणार असल्याचे दावे

Claim Review : टाटा नॅनो ही कार जरी बंद झालेली असली तरी ती पुन्हा नोएल टाटा यांच्या नेतृत्वाखाली लाँच केली जाणार असल्याचा दावा.
Claimed By : FaceBook User
Fact Check : चूक

Created By: factlyTranslated By: ऑनलाईन लोकमतरतन टाटांचे स्वप्न असलेली टाटा नॅनो ही कार जरी बंद झालेली असली तरी ती पुन्हा नोएल टाटा यांच्या नेतृत्वाखाली लाँच केली जाणार असल्याचे दावे केले जात आहेत. या कारशी संबंधीत फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले जात होते. यामध्ये पेट्रोल इंजिन आणि शहरात चालविण्यासाठी नवे डिझाईन व ३० किमीचे मायलेज देत असल्याचे दावेही केले जात होते.  हे दावे इथे केले जात होते.या पोस्टमध्ये केलेल्या दाव्यांची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही गुगल सर्चवरून शोध घेतला परंतु अशी कोणतीही घोषणा आढळली नाही. टाटा मोटर्सने असे विधान केले असते तर त्याची व्यापक चर्चा झाली असती. तथापि, TATA Motors च्या सोशल मीडियावर किंवा कोणत्याही विश्वासार्ह न्यूज प्लॅटफॉर्मवर याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. 

फोटोद्वारे गुगल लेन्सचा वापर करून शोध घेतला असता तिथे आम्हाला यूट्यूब चॅनल ह्यू बोगन मोटर्सवरील एक व्हिडीओ दिसला. हा व्हिडीओ 15 ऑगस्ट 2023 रोजीचा आहे. ही कार टाटाची नॅनो ही नसून तिच्याशी साधर्म्य असलेली टोयोटा आयगो एक्स पल्स ही आहे. 

व्हायरल केलेल्या पोस्टमध्ये टोयोटाचा लोगो बदलण्यात आलेला आहे. तसेच नंबर प्लेटवरील नावही बदलण्यात आले आहे. 

खालील तुलना TATA Motors आणि Toyota Motors च्या कारवरील लोगोमधील फरक दर्शवते. 

तसेच TATA Motors शी ईमेलद्वारे संपर्क साधला असता त्यांनी अशा कोणत्याही कारच्या लाँचिंगबाबत माहिती नाही असे सांगितले. ग्राहकांना योग्य वेळी अधिकृत संपर्क माध्यमांद्वारे नवीन उत्पादनांची माहिती दिली जाईल असे ते म्हणाले. तर टोयोटाच्या वेबसाईटवर ही कार सापडली आहे.

निष्कर्ष : TATA मोटर्सने आधुनिक वैशिष्ट्यांसह नवीन नॅनो कार लॉन्च करण्याची कोणतीही घोषणा केलेली नाही, व्हायरल फोटो हे एडिट करण्यात आलेले आहेत. (सदर फॅक्ट चेक Factly या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

टॅग्स :TataटाटाToyotaटोयोटा