शहरं
Join us  
Trending Stories
1
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
2
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
3
लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील'
4
भगवद्गीतेची पुतिन यांनाही भुरळ, भारतातून परतताना विमानात केले वाचन; PM मोदींचा मान राखला!
5
Pune Crime: "माझ्या बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोड", रागावलेल्या बॉयफ्रेंडने २९ वेळा वार करत सोन्याला संपवले  
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील पाचपट! फिरतानाही दिसेल भारतीय संस्कृतीची झलक
7
तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो?
8
'इंडिगो' प्रकरणानंतर सरकार सावध, अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी केंद्राची राज्यसभेतून मोठी घोषणा
9
हळूहळू दिवाळखोर होतोय अमेरिका! डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत १५ वर्षांचा विक्रम मोडला
10
हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
11
Video - कडक सॅल्यूट! पॅरालाइझ्ड आहे, कमकुवत नाही... ५२ वर्षीय Zepto डिलिव्हरी वुमन
12
'बोल्डनेस'चा कहर! युवराज सिंगसोबत समुद्राच्या मधोमध फोटोशूट, जाणून घ्या 'ती' सुंदरी कोण?
13
माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
14
IndiGo: प्रवाशांचे हाल, तिकीट खिडकीवर गोंधळ, विमानतळांवर सामानाचा ढिग; पाहा फोटो!
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत
16
नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची भास्कर जाधव, पटोलेंची मागणी, फडणवीसांनी दिलं असं उत्तर
17
"लगेच मदत मिळाली असती तर.."; लखनौ विमानतळावर वाट बघत राहिले अन् त्यांना मृत्यूनं गाठलं!
18
"मालती कशी वाटली?", प्रणित मोरेच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "त्या दोघांमध्ये..."
19
गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
20
मला का जाब विचारता? सूरजलाच विचारा...; धनंजय पोवारचा संताप अनावर, नक्की विषय काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या मुलीचा मुस्लिम तरुणाशी विवाह? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 18:15 IST

Fact Check: या पोस्टमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीने मुस्लिम तरुणाशी लग्न केल्याचा दावा केला जात आहे.

Claim Review : व्हायरल पोस्टमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीने मुस्लिम तरुणाशी लग्न केल्याचा दावा आहे.
Claimed By : Social Media User
Fact Check : चूक

Created By: FactlyTranslated By: ऑनलाइन लोकमत

Fact Check : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला यांनी कोटा येथील व्यापारी कुटुंबातील मोहम्मद अनिश नावाच्या मुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमधून (इकडे, इथे आणि इथे) करण्यात आला आहे. त्यामुळे या दाव्याची सत्यता जाणून घेऊया.

अर्काईव्ह पोस्टसाठी येथे क्लिक करा.

दावा काय आहे : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला यांनी मोहम्मद अनिश नावाच्या मुस्लिम मुलाशी लग्न केले.

फॅक्ट : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला यांनी १२ नोव्हेंबर २०२४ रोजी अनिश रजनी या सिंधी हिंदू मुलाशी लग्न केले. अनेक बातम्यांमधूनही याबाबत माहिती दिली गेली आणि गयाचे माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य हरी मांझी यांनीही एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) या अफवांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. हरी मांझी यांनी अंजली बिर्लांच्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे. त्यामुळे पोस्टमध्ये केलेला दावा खोटा आहे. या दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही एक गुगल कीवर्ड सर्च केला. त्यानंतर आम्हाला १३ नोव्हेंबर २०२४ च्या बातम्या (येथे आणि येथे) सापडल्या. वृत्तानुसार, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला यांनी १२ नोव्हेंबर २०२४ रोजी बिझनेसमन अनिश रजनीसोबत लग्न केले. अनिश एका सिंधी व्यापारी कुटुंबातील असून सध्या ते आपल्या कुटुंबाचा व्यवसाय पुढे नेण्यात व्यस्त आहेत.

याव्यतिरिक्त, आम्ही गयाचे माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य हरी मांझी यांचे १३ नोव्हेंबर २०२४ रोजीचे एक ट्विट पाहिले, ज्यात अंजली बिर्ला यांच्या लग्नाविषयीच्या अफवांचे स्पष्टीकरण होते. त्यांनी सांगितले की अंजलीते पती, अनिश रजनी हे कोटा येथील एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील सिंधी हिंदू आहेत आणि त्यांच्या लग्नाची पत्रिका त्यांच्या ट्विटमध्ये शेअर केली.

खरं तर यापूर्वी अंजली बिर्ला यांच्या बद्दलचा असाच दावा खोडून काढण्यात आला होता, ज्यात आरोप होता की त्यांची सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा (CSE) न बसता आयएएससाठी निवड झाली होती.

निष्कर्ष :  लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला यांनी मुस्लिम नाही तर सिंधी हिंदू असलेल्या अनिश रजनीशी लग्न केले आहे.

(सदर फॅक्ट चेक FACTLY या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.) 

टॅग्स :om birlaओम बिर्लाSocial Viralसोशल व्हायरलFake Newsफेक न्यूज