जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं असताना सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. पण, फॉर्म्युला वन शर्यतीचे माजी प्रमुख बर्नी एस्लेस्टन यांच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. एस्लेस्टन हे वयाच्या 89व्या वर्षी बाप झाले आहेत. त्यांची पत्नी फॅबिआना फ्लोसी हिचं वय हे बर्नींपेक्षा निम्मे आहे. या जोडप्याला पुत्ररत्न प्राप्ती झाली. एस्लेस्टन यांना पाच नातवंड आहेत आणि येत्या ऑक्टोबरमध्ये ते 90 वर्षांचे होतील.
त्यांनी सांगितले की,''आम्हाला मुलगा झाला आहे आणि त्याचं नाव ऐस असं ठेवलं आहे. मला अभिमान वाटतोय.'' स्वित्झर्लंड येथील घरी एस्लेस्टन आणि फॅबिआना सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. एस्लेस्टनला आधी तीन मुली आहेत आणि मुलगा झाल्यानं त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. त्यानं सोशल मीडियावर नव्या बाळाचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी एस्लेस्टन यांनी 90व्या वर्षीही बाप बनण्याचा निर्धार बोलून दाखवला.
भारतीय क्रिकेटपटूंना ओळखलंत का? अष्टपैलू खेळाडूनं शेअर केला पहिल्या मुलाखतीचा व्हिडीओ
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं 64 वर्षीय वृद्धाला गाडीनं उडवलं; थरकाप उडवणारा Video व्हायरल!
पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय खेळाडू आमची माफी मागायचे - शाहिद आफ्रिदी