Sri Lankan batsman Kusal Mendis arrested by local police for causing fatal motor accident | आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं 64 वर्षीय वृद्धाला गाडीनं उडवलं; थरकाप उडवणारा Video व्हायरल!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं 64 वर्षीय वृद्धाला गाडीनं उडवलं; थरकाप उडवणारा Video व्हायरल!

श्रीलंकेचा फलंदाज कुशल मेंडीस याला एका पादचाऱ्याला गाडीनं उडवल्याप्रकरणी रविवारी अटक करण्यात आली. त्याच्या तपासाचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला असून त्यात मेंडीस मद्य पिऊन गाडी चालवत नसल्याचे समोर आले आहे. पण, त्याच्या गाडीच्या अपघाताचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरत होत आहे. भरधाव वेगानं गाडी चालवणाऱ्या मेंडीसनं सायकलस्वार 64 वर्षीय वृद्धाला उडवल्याचा हा व्हिडीओ थरकाप उडवणारा आहे.

पनादुरा येथून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी मेंडीसच्या गाडीनं या वृद्धाला उडवलं. श्रीलंका क्रिकेट बोर्डातील एका सदस्याचं लग्नाला मेंडीस आणि सहकारी अविष्का फर्नांडो गेले होते. तेथून घरी परतत असताना हा अपघात झाला. गाडी चालवताना मेंडीसला डुलकी लागल्यानं त्याचा गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाल्याचे, तपासात समोर आले आहे.

लग्नकार्य उरकल्यानंतर मेंडीस अनेक सहकाऱ्यांना त्यांच्या घरी सोडून परतत होता.  या अपघातात वृद्धाचे निधन झाले आहे. 25 वर्षीय मेंडीसनं 44 कसोटी आणि 76 वन डे सामन्यांत श्रीलंका संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे आणि त्यानं अऩुक्रमे 2995 आणि 2167 धावा केल्या आहेत. 

पाहा व्हिडीओ...


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sri Lankan batsman Kusal Mendis arrested by local police for causing fatal motor accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.