शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषित वीज प्रकल्पांबद्दल सरकारला सहानुभूती का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 01:01 IST

भारताचा विचार केल्यास २०१२ मध्ये येथे विजेच्या एकूण मागणीच्या प्रमाणात कमी वीजनिर्मिती क्षमता होती. संपूर्ण देशात लोडशेडिंगसारख्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे कोळसा खाणी व वीज प्रकल्पांना यावेळी उधाण आले होते.

जगाचे विकासाचे मॉडेल हे ऊर्जा वापरावर आधारित आहे. उद्योग, कृषी, सिंचन, दळणवळण ही सर्वच क्षेत्रे ऊर्जेशिवाय चालू शकत नाहीत. विकासाचे चक्र चालविणारी ऊर्जा हीच जर का प्रदूषण करून निर्माण होत असेल, तर जागतिक विकास साधताना पर्यावरण स्वच्छ राखणे निव्वळ अशक्य आहे.

भारताचा विचार केल्यास २०१२ मध्ये येथे विजेच्या एकूण मागणीच्या प्रमाणात कमी वीजनिर्मिती क्षमता होती. संपूर्ण देशात लोडशेडिंगसारख्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे कोळसा खाणी व वीज प्रकल्पांना यावेळी उधाण आले होते. मागील ७-८ वर्षांमध्ये मात्र परिस्थिती खूप बदलली आहे. आज देशात ३६९ गिगावॅट एवढ्या वीजनिर्मितीची क्षमता असताना विजेची मागणी याच्या फक्त ४० टक्के आहे. दि.२४ मार्च रोजी (लॉकडाऊनपूर्वी) देशात सर्व उद्योगधंदे सुरू असताना विजेची मागणी फक्त१४६ गिगावॅट एवढी होती. या ३६९ गिगावॅट ऊर्जेमध्ये कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्पांमधून १९८ गिगावॅट, सौरऊर्जा, पवनऊर्जा या अपारंपारिक ऊर्जास्रोतांपासून ८८ गिगॅवॅट व जैवइंधनासारख्या इतर स्रोतांपासून ८३ गिगावॅट, अशी वीजनिर्मिती क्षमता आहे. म्हणजेच टाळेबंदीपूर्वीसुद्धा संपूर्ण देशाची विजेची मागणी ही औष्णिक वीज प्रकल्पांशिवाय हिरव्या समजल्या जाणाºया अपारंपरिक व इतर ऊर्जास्रोतांपासून मिळणाºया ऊर्जेवर भागू शकत होती. असे असेल तर मग अजूनही कोळशावर आधारित प्रदूषित वीज प्रकल्पांबद्दल सरकारला सहानुभूती का असावी, हे मात्र अनाकलनीय आहे. कोविड-१९ नंतरच्या जगाचा विचार करता अत्यंत भयावह प्रदूषण करणाºया कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्पांना आता टाटा करण्याची गरज आहे.

हळूहळू क्रमाक्रमाने औष्णिक वीजनिर्मिती संच बंद करावेत. त्यासाठी या क्षेत्राला मिळणाºया सर्व सवलती सरकारने त्वरित बंद कराव्यात. सोबतच त्याच जिल्ह्यांमध्ये अपारंपरिक ऊर्जास्रोतांची निर्मिती करून तिथल्या रिकाम्या हातांना या नव्या ऊर्जाक्षेत्रात काम द्यावे. या क्षेत्राला भरपूर सवलती द्याव्यात. एवढे झाल्यास पुढील पाच वर्षांत भारतातील प्रदूषणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटलेला दिसेल.-किशोर रिठे,माजी सदस्य, केंद्रीय वन्यजीव मंडळ

टॅग्स :World Environment DayWorld Environment Dayenvironmentपर्यावरण