शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

सारांश लेख: झाड कापताना त्यातून रक्त सांडतं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2023 11:36 IST

सरकारनेच गांभीर्याने झाडांच्या पुनर्वसनाचा विचार करावा.

सयाजी शिंदे, अभिनेते - वृक्षप्रेमी

आपल्याकडे अनेक ठिकाणी महामार्गांच्या बांधणीचे आणि रुंदीकरणाचे काम सुरू आहे; पण या सर्वात मोठ्या प्रमाणावर बळी जातोय तो आपल्याला अखंड ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचा. नुकतीच पुणे-बंगळुरू रस्त्यावर काही झाडे कापली गेली. त्यातही एक मोठे किमान २०० वर्षे जुने वडाचे झाड देखील पाडले. वड हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. आता या झाडाने गेल्या २०० वर्षांत जो ऑक्सिजन दिला, त्याच्या सानिध्यात वाढलेल्या अन्य झाडांना-वेलींना जीवदान दिले, झाडावर बसणाऱ्या पक्ष्यांचा आसरा दिला, त्यांचा एक अधिवास पाडण्यात आला, त्याची किंमत आपण कशी मोजणार आहोत?

आपण  याचा कधीतरी गांभीर्याने विचार करणार आहोत की नाही? कुठे चाललो आहोत आपण? आपल्याला भविष्यात याची काय व किती किंमत मोजावी लागेल, याची काही कल्पना आहे का? अलीकडेच पुणे-बंगळुरू रस्त्यावर पाडलेल्या या वडाच्या झाडाची माहिती मिळाल्यावर मी माझ्या टीमसह तिथे पोहोचलो. तिथे कायतर म्हणे मधमाश्यांनी आमच्यावर हल्ला केला. अरे, त्यांनी हल्ला नाही केला. त्या झाडाला पाडल्यावर आम्ही तिथे पाहायला गेलो. आम्ही त्यांच्या अधिवासात प्रवेश केला. तेव्हा त्यांची ती प्रतिक्रिया होती, असे म्हणायला हवे. आज त्या रस्त्यावर जी झाडे पडली आहेत, त्या झाडांच्या फांद्यांवर झालेल्या वाऱ्यामुळे त्यातून पांढरा चिक गळतो आहे. हा पांढरा चिक म्हणजे त्या झाडांचे रक्त आहे हो ! ही भळभळती जखम आपल्याला कधी समजणार? किती बदललो आपण! गावात एखादा सरपंच वारला तर आपण मोठी शोकसभा घेतो. गाव धाय मोकलून रडतो. त्या सरपंचाची महती सांगतो. अरे पण तो सरपंच होता पाच वर्षे. त्यातही दोन पक्षांची इकडची-तिकडची कामे त्याने केली. पण ही झाडे तब्बल २०० वर्षे इथे आहेत.

ज्या झाडाने २०० वर्षे तुम्हाला निरपेक्षपणे निर्मळ श्वास दिला, सावली दिली आणि मोजण्यापलीकडचे उपकार तुमच्यावर केले, ते उन्मळल्यावर त्याची शोकसभा व्हायला नको?, एवढी आपली संवेदनशीलता हरपली का? तुमच्या सरणावर रचले जाण्यासाठी या झाडांनी आज स्वतःचा जीव गमावला आहे, असे मला राहून राहून वाटते.

- विकासकामे करताना वृक्षतोड केली जाते; पण अशावेळी झाडांची कत्तल करण्यापूर्वी जरा नियोजन करा. या झाडांना अन्यत्र हलवून तिथे त्यांचे पुनर्वसन करा. ते करणे सहज शक्य आहे. निसर्गाची स्वतःची एक जैवसाखळी आहे. - ती अशा पद्धतीने नष्ट करणे भविष्यात मानव जातीच्या मुळावर बेतू शकते, याचा किमान विचार होणे ही काळाची गरज आहे. - औरंगाबाद, परभणी येथील रस्त्यांची कामे सुरू असताना आम्ही ४०० पैकी ४० झाडे वाचवली. त्यांचे प्रत्यारोपण केले; पण माझ्यासारख्या एका माणसाच्या क्षमतेला मर्यादा आहेत.

सरकारनेच जर गांभीर्याने याचा विचार करून झाडांच्या पुनर्वसनाचा विचार करून कृती करत, मग विस्ताराची आणि विकासाची कामे केली तर निसर्गाचा तोलही सांभाळला जाईल. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याचे माझे सरकारला नम्र आवाहन आहे.

टॅग्स :sayaji shindeसयाजी शिंदेforestजंगलenvironmentपर्यावरण