शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! गोदाकाठी मृत माशांचा खच; कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 13:24 IST

पर्यावरण प्रेमींनी यापूर्वीच जलचर प्राणी प्राण्यांना धोका असल्याची शक्यता वर्तविली होती.

ठळक मुद्देनदीत चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे मृत माशांचा खच पडला होता पाण्यातील दोष शोधून मृत्यूचे कारण शोधण्याचे पर्यावरण प्रेमींचे आवाहन

नांदेड : शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठी जवळपास सर्वच घाटांवर माशांचा खच पडला आहे. मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून मासे नेमकी कशामुळे मेले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नांदेड शहरातून गोदावरी वाहते, 'गुरु-ता-गद्दी'च्या काळात नदीकाठच्या सर्वच घाटांचा विकास करण्यात आला आहे. परंतु, नांदेड शहरातून निघणारे जवळपास 18 ड्रेनेज लाईनचे घाण पाणी थेट गोदावरी पात्रात सोडण्यात आल्याने पर्यावरण प्रेमींनी यापूर्वीच जलचर प्राणी प्राण्यांना धोका असल्याची शक्यता वर्तविली होती.

जागतिक पर्यावरण दिनी गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी विनंती प्रा.डॉ. किरण शिल्लेवार यांनी केली होती. परंतु याकडे महापालिका प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले. आज गोदावरी नदीकाठी ठिकाणी मृत माशांचे ढिगारे लागले आहेत. माशांच्या मृत्यूला महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप वन्यजीव प्रेमी तसेच पर्यावरण प्रेमी कडून करण्यात येत आहे.

यापूर्वी देखील घडली होती अशी घटनानांदेड शहरापासून जवळच असलेल्या शिकारघाट परिसरात आसना नदीत चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे मृत माशांचा खच पडला होता त्याचबरोबर इतर जलचर प्राणी मृत पावले होते. सदर घटना परिसरातील एका कारखान्याचे दूषित पाणी थेट नदीत सोडल्यामुळे घडली होती.

पाण्यातील दोष शोधून मृत्यूचे कारण शोधावेगोदावरी नदीकाठी मृत माशांचा खच पडला आहे. ही घटना दुर्दैवी आहे. परंतु ही मासे नेमकी कशामुळे मृत झाली याचे कारण आताच सांगणे शक्य नाही. नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. लवकरच पाण्यातील दोष शोधून मृत्यूचे कारण शोधले जाईल.  त्याचबरोबर मृत मासे कोणीही मासे विक्री व्यवसायिकांनी विक्री करू नये अथवा नागरिकांनीदेखील ते खाऊ नये. कारण त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मृत मासे खाल्ल्याने अपाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - प्रा.डॉ. किरण शिल्लेवार, मत्स्यशास्त्र विभाग प्रमुख, सायन्स कॉलेज, नांदेड

महापालिका प्रशासनाने सतर्क व्हावेगोदावरी नदी काठावर मृत माशांचा खच पडला असून ही घटना दुर्दैवी आहे या माशांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे हे माहिती नाही. परंतु मृत माशांचा खच पाहून खूप वाईट वाटले गोदावरी नदी नांदेड शहराचे वैभव असून तिच्या सुशोभीकरणाचा सह स्वच्छता आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता तरी सतर्क व्हावे. - किशोर वागदरीकर, पर्यावरण प्रेमी नागरिक

टॅग्स :Nandedनांदेडgodavariगोदावरीenvironmentपर्यावरण