शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षणाच्या यादीतून वगळले चंदनाचे झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 17:34 IST

Sandalwood tree ForestDepartment : वृक्षतोड अधिनियमानुसार संरक्षित असलेल्या चंदनाचे झाड तोडण्यासाठी आता वनविभागाची परवानगी लागणार नाही. वनविभागाने एप्रिलमध्ये काढलेल्या अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांच्या शेतात असलेले चंदनाचे झाड वनविभागाच्या संरक्षण असणाऱ्या यादीतून वगळण्यात आले आहे. औषधी वनस्पती म्हणून चंदनाची झाडे ओळखली जातात. वृक्षतोड अधिनियम १९६४ नुसार चंदनाची झाडे तोडण्यास वनविभागाची परवानगी घ्यावी लागत होती.

ठळक मुद्देसंरक्षणाच्या यादीतून वगळले चंदनाचे झाड वनविभागाच्या परवानगीची गरज नाही

कोल्हापूर : वृक्षतोड अधिनियमानुसार संरक्षित असलेल्या चंदनाचे झाड तोडण्यासाठी आता वनविभागाची परवानगी लागणार नाही. वनविभागाने एप्रिलमध्ये काढलेल्या अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांच्या शेतात असलेले चंदनाचे झाड वनविभागाच्या संरक्षण असणाऱ्या यादीतून वगळण्यात आले आहे. औषधी वनस्पती म्हणून चंदनाची झाडे ओळखली जातात. वृक्षतोड अधिनियम १९६४ नुसार चंदनाची झाडे तोडण्यास वनविभागाची परवानगी घ्यावी लागत होती.यात श्वेतचंदन आणि रक्तचंदन अशा दोन प्रकारच्या प्रजाती आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर अनेकदा चंदनाची झाडे लावली जात होती. परंतु ती झाडे तोडण्यास वनविभागाची परवानगी लागत होती. मात्र आता नव्या अधिसूचनेनुसार अशा परवानगीची गरज उरलेली नाही. हे झाड आता शेतातील पीक म्हणूनच गृहित धरले जात आहे. राज्यात आतापर्यंत पाचशे हेक्टर क्षेत्रात चंदनाच्या झाडाची लागवड आहे.नव्या अधिसूचनेनुसार चंदनाचे झाड हे शेतकऱ्याचे पीक म्हणून गृहित धरले असून लागवडीसाठी ते अनुदानासही पात्र समजले जात आहे. याशिवाय याच्या रोपवाटिकेसाठीही अनुदान दिले जाणार आहे. वन्यप्राण्यांकडून चंदनाच्या झाडांचे नुकसान झाल्यास त्यासाठीही भरपाई देण्याची तरतूद आता करण्यात आली आहे.महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबतच्या अधिसूचना १९६४ (३४) च्या कलम २, खंड फ अनुसार राज्य सरकारने अधिसूचना काढून चंदनाचे झाड संरक्षणाच्या यादीतून वगळले आहे. या अधिनियमात अनुसूचित अनुक्रमांक ८ मधील चंदनाशी संबंधित नोंद वगळण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. २३ मार्च २०२१ रोजी राज्यपालांच्या आदेशानुसार राजपत्रात याची नोंद झाली आहे.पूजेसाठी आणि औषधासाठी चंदनाची मोठी मागणी आहे. या नव्या अध्यादेशामुळे शेतकरी चंदन लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळू शकतो. मात्र, सरसकट चंदन तोडले गेल्यास त्याचे पर्यावरणीय परिणामही होणार आहेत. मूळात कोणतेही झाड तोडण्यास परवानगी लागत असताना चंदनाला त्यातून वगळण्यास वाईट संदेश जाईल असे वनस्पतीतज्ज्ञांचे मत आहे. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असलेल्याच चंदनाची झाडे तोडण्यापुरते हा अध्यादेश पाहिला जावा, असे मत प्रा. मधुकर बाचुळकर यांनी व्यक्त केले आहे.ही झाडे तोडण्यास लागते परवानगीमहाराष्ट्र झाडे तोडण्याबाबतच्या अधिसूचना १९६४ (३४) च्या कलम २, खंड फ अनुसार हिरडा, साग, मोह, चिंच, आंबा, जांभूळ, खैर, चंदन, तिवस, अंजन, किंजन, फणस, हळदू, बीजा, ऐन, मॅन्ग्रोव्ह आदी १६ झाडांची तोड करण्यासाठी वनविभागाची परवानगी लागते. 

टॅग्स :environmentपर्यावरणforest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर