शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चित्रे रेखाटून रंगपंचमी साजरी करणार, शाहूपुरी कुंभार गल्लीतील लहान मुलांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 11:44 IST

Holi Kolhapur-निसर्गमित्र आणि इंडियन मार्शल आर्ट थांग-ता असोसिएशनतर्फे आयोजित उपक्रमात शाहूपुरी कुंभार गल्लीतील लहान मुलांनी वनस्पतीजन्य रंगनिर्मितीचे धडे गिरविले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी थांबून चित्रे रेखाटून, रांगोळी काढून रंगपंचमी साजरी करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.

ठळक मुद्देचित्रे रेखाटून रंगपंचमी साजरी करणार, शाहूपुरी कुंभार गल्लीतील लहान मुलांचा संकल्पनिसर्गमित्र, इंडियन मार्शल आर्ट असोसिएशनचा उपक्रम

कोल्हापूर : निसर्गमित्र आणि इंडियन मार्शल आर्ट थांग-ता असोसिएशनतर्फे आयोजित उपक्रमात शाहूपुरी कुंभार गल्लीतील लहान मुलांनी वनस्पतीजन्य रंगनिर्मितीचे धडे गिरविले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी थांबून चित्रे रेखाटून, रांगोळी काढून रंगपंचमी साजरी करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.शाहूपुरीतील महादेव वडणगेकर यांच्या निवासस्थानी वनस्पतीजन्य रंगांची प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. त्यात निसर्गमित्रचे कार्यवाह अनिल चौगुले आणि राणिता चौगुले यांनी मार्गदर्शन केले. बेल, पालक, पुदिना, बीट. टोमॅटो, कढीपत्ता, पारिजातक आदी वनस्पतींपासून रंगनिर्मितीची प्रात्यक्षिके त्यांनी करून दाखविली.

विविध ४१ प्रकारच्या वनस्पतींच्या पाने, फुले, फळे, त्यांच्या साली, तर विविध पालेभाज्या, फळभाज्यांच्या टाकाऊ पदार्थांपासून रंगनिर्मितीची माहिती दिली. या वनस्पतीजन्य रंगांचा वापर करून रंगपंचमीदिवशी घरी थांबून चित्रे, रांगोळी रेखाटावी. नैसर्गिक खाद्यरंग वापरून आपल्या आवडीचा पदार्थ तयार करणे, घरात पाण्याचा कितपत वापर होतो, याची माहिती घेणे, आदी उपक्रम राबविण्याचे आवाहन अनिल चौगुले यांनी केले. त्यावर अशा पध्दतीने रंगपंचमी साजरी करण्याचा संकल्प उपस्थित मुले, मुली आणि त्यांच्या पालकांनी केला.

यावेळी अविनाश वडणगेकर, सुनीता कुंभार, शिवाजी कुंभार, आदी उपस्थित होते. इंडियन मार्शल आर्ट थांग-ता असोसिएशनचे सचिव सतीश वडणगेकर यांनी प्रास्ताविक केले. सुनंदा वडणगेकर यांनी आभार मानले.रंगनिर्मितीची झाडे लावापळस, आवळा आदी रंगनिर्मिती करणाऱ्या झाडांच्या बिया संकलित करा. या कार्यशाळेत तुम्हाला दिलेल्या विविध वनस्पतींच्या बिया रूजवून त्यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक वनस्पतीजन्य रंगनिर्मितीसाठीची झाडे लावा, असे आवाहन चौगुले यांनी केले. विविध सण, उत्सवावेळी वापरलेल्या फुलांपासून ४५ कुटुंबांनी स्वत:साठी रंगनिर्मिती केली असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Holiहोळीenvironmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर