शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माळढोक पक्ष्यासाठी परिसर अनुकूल ठेवणे, ही आता सर्वांचीच जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 11:49 IST

सोलापुरातील पर्यावरण प्रेमींचे मत; माळढोक अन् लोकांचाही अध्यादेशात विचार, अटींचे पालन व्हावे

ठळक मुद्देमाळढोक हा सोलापूरची शान आहे. आपल्याकडे माळढोक पुन्हा मोठ्या संख्येने यायला हवासध्या या परिसरात माळढोक दिसत नसले तरी भविष्यात तो पुन्हा येऊ शकतोमाळढोकच्या या अभयारण्यात प्रदूषण होऊ नये याची खबरदारी घ्यावी

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : केंद्र सरकारच्या वन, पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयातर्फे माळढोक अभयारण्यासंदर्भात अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. अभयारण्य क्षेत्रात कोणता भाग येतो, तिथे कोणत्या प्रकारचे उद्योग करता येतील, नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. याचे पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले असून नागरिकांनी अटीचे पालन करावे असे आवाहन केले आहे. आपला परिसर माळढोक पक्ष्यासाठी अनुकूल असला पाहिजे, ही आता आपली जबाबदारी आहे.

पक्ष्यांना धोका निर्माण होऊ नये यादृष्टीने कुटीर उद्योग, गवताळ क्षेत्र, नैसर्गिक शेती करण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. माळढोकचा विचार करताना नागरिकांना यामुळे नुकसान होऊ नये अशा तरतुदी केल्या आहेत. इको सेन्सेटिव्ह झोनमधील क्षेत्रामध्ये काही परवानगीची गरज असल्यास जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वनविभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासहित नऊ जणांची समिती नेमण्यात येणार आहे.

राजस्थानमध्येही माळढोकची संख्या कमी झाली आहे. आपल्या अभयारण्यात तो पुन्हा येऊ शकतो. माळढोकच्या या अभयारण्यात प्रदूषण होऊ नये याची खबरदारी घ्यावी. जैवविविधतेच्या संरक्षणाच्या दृष्टीने काही सूचना मांडण्यात आल्या आहेत. याचे तंतोतंत पालन करायला हवे. काही ठिकाणी अनधिकृतरित्या खाणी सुरु असल्यास त्या बंद व्हायला हव्यात, अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली.

यापूर्वी इको सेन्सेटिव्ह झोन मोठा होता. आता त्याची नेमकी सीमा निश्चित करण्यात आली आहे. सध्या या परिसरात माळढोक दिसत नसले तरी भविष्यात तो पुन्हा येऊ शकतो. यासाठी तेथील परिसर माळढोक पक्ष्यांसाठी अनुकूल असायला हवा. याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.- डॉ. निनाद शहा, मानद वन्यजीव रक्षक

माळढोक हा सोलापूरची शान आहे. आपल्याकडे माळढोक पुन्हा मोठ्या संख्येने यायला हवा. माळढोकमुळे इतर जीवांनाही अभय मिळते. गवताळ रानाला महत्त्व नसल्याची मानसिकता आपल्याकडे आहे. यामुळे गवताळ रानाला आणखी महत्त्व प्राप्त होईल. तसेच नागरिकांच्या मनातील गवताळ रानाविषयीचे गैरसमज दूर होतील.- भरत छेडा, प्रमुख, नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कल

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरण