शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 07:07 IST

कोविडनंतर भारतात मनोरंजन क्षेत्रात २०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुढील २० वर्षांमध्ये काय घडेल ते आज सांगणे कठीण आहे; पण मनोरंजनाचा व्यवसाय वाढत आहे. स्टोरी टेलिंगपासून सारे काही बदलत आहे. मागच्या वर्षी भारतीयांनी ओटीटीवर ३० लाख तास विविध प्रकारचा कंटेंट पहिला. भारतात खूप सुंदर सिनेमा संस्कृती आहे. लोक एकरूप होऊन सिनेमा बघतात, असे नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सारंडोस यांनी सांगितले. 

कोविडनंतर भारतात मनोरंजन क्षेत्रात २०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक झाली, असेही सारंडोस यांनी ‘नवीन भारताचे प्रवाहीकरण : संस्कृती, कनेक्टिव्हिटी आणि सर्जनशील गुंतवणूक’ या चर्चासत्रात सांगितले. अभिनेता सैफ अली खान यांनी त्यांना बोलते केले. रामायण, महाभारत, पंचतंत्र, लोककथांवर आधारलेले कंटेंट जगभरातील रसिकांच्या मनात घर करू शकतात, असा विश्वास अभिनेता सैफ अली खान याने व्यक्त केला. ‘ओंकारा’ आणि ‘परिणीता’ या सिनेमांची उदाहरणे सैफ अली खान यांनी दिली. 

मनोरंजनाच्या सीमारेषा आज धूसर झाल्या आहेत. करमणुकीची साधने बदलली आहेत. बालपणीच्या एक पडदा सिनेमागृहात सिनेमा पाहण्याच्या दिवसांची त्याने आठवण करून दिली. लेखन खूप टोकदार असायला हवे. कॅरेक्टर चांगल्या प्रकारे लिहिली गेली तर ती चांगली परफॉर्म करता येतात. आंतरराष्ट्रीय पद्धतीने गोष्ट सांगणे हा विचारच खूप उत्साहित करणारा आहे. महाभारतसारखे महाकाव्य कालातीत आहे, असेही सैफ अली खान यांनी सांगितले.

ओटीटीचा बोलबाला?किती जण नेटफ्लिक्स बघतात, यावर टेड यांनी उपस्थितांना हात वर करायला सांगितले. सभागृहातील ९० टक्के लोकांचे हात वर होते. यावरून आज ओटीटीला किती महत्त्व प्राप्त झाले आहे याची झलक पाहायला मिळते, असे त्यांनी सांगितले. कथाकथनाद्वारे प्रेक्षकांशी जोडण्याचा हेतू कायम आहे.