शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मालवणात मध्यरात्री हायव्हॉल्टेज ड्रामा; भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये सापडली लाखोंची रोकड?
2
Local Body Elecctions Voting: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान
3
आजचे राशीभविष्य, २ डिसेंबर २०२५: सामाजिक क्षेत्रात सफलता व कीर्तीलाभ होण्याची शक्यता
4
प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सरकारचे 'संचार साथी' ॲप; इच्छा असूनही डिलीट करता येणार नाही
5
रुपयाची ९०कडे वाटचाल! रुपयाची आशियातील इतर चलनांच्या तुलनेत वर्षभरात सर्वांत खराब कामगिरी
6
यंग सायंटिस्ट अवॉर्ड ते देशद्रोही! पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला जन्मठेपेऐवजी तीन वर्षे कैद
7
अग्रलेख: आयोगावर आक्षेपांचे ढग! विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह तर येणारच
8
Local Body Elections: निवडणुका रद्द करण्यावरून आयोगावर सर्वपक्षीय संताप, पोरखेळ चालल्याची टीका
9
...तर बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाला स्थगिती, तीन दिवसांत मागितले उत्तर
10
देशातील महिलांना मिळणार विनातारण ३ लाखांपर्यंत कर्ज
11
विशेष लेख: बहुराष्ट्रवादाची हार आणि जागतिक संस्थांची थडगी
12
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
13
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
14
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
15
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
16
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
17
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
18
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
19
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
20
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

World Environment Day: पर्यावरण, आपले आरोग्य आणि आपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 00:57 IST

आरोग्य म्हणजे नुसता आजारांचा अभाव नाही, तर संपूर्ण मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि  सामाजिकदृष्टीने संपूर्ण संतुलित जीवन, अशी जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आरोग्याची व्याख्या आहे. यात मला एक प्रचंड अभाव जाणवतो तो म्हणजे पर्यावरणीय दृष्टीने संतुलित जीवन.

ज्या पद्धतीने कोरोना विषाणूने जगभर धुमाकूळ घातला आहे, त्यादृष्टीने बघता ‘आपले आरोग्य आपल्या हाती’ या म्हणीपेक्षा आता ‘आपले आरोग्य निसर्गाच्या हाती’ हे मानवाने समजणे जास्त योग्य ठरेल. खरे म्हणजे हेच खरेही आहे. कारण मानव हा निसर्गाच्या अन्नसाखळीतील एक छोटा घटक आहे; परंतु मानव पिढ्यान्पिढ्या निसर्गाचे आधिपत्य न मानता स्वत:च्या मनाने वागून निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे जेव्हाही निसर्गचक्र अति जास्त बिघडल्याने प्रश्न उभे झाले आहेत, तेव्हा निसर्गाने एक प्रकारचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आह,े हे आपल्याला बºयाच उदाहरणांतून दिसून येते. एका पद्धतीने कोरोनासारख्या विषाणूंना रोखण्यास आपण असमर्थच ठरतो आहे, हे सतत अनुभवास येते आहे.

आरोग्य म्हणजे नुसता आजारांचा अभाव नाही, तर संपूर्ण मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि  सामाजिकदृष्टीने संपूर्ण संतुलित जीवन, अशी जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आरोग्याची व्याख्या आहे. यात मला एक प्रचंड अभाव जाणवतो तो म्हणजे पर्यावरणीय दृष्टीने संतुलित जीवन. वायू, जल, ध्वनी, प्रकाश, असे विविध प्रकारचे प्रदूषण, उत्सर्जन, जंतुमय भूजल, खराब अन्नपदार्थ, अति प्रचंड बांधकामे, अनियंत्रित वृक्षतोड, शेतीतील जंतुनाशके आणि पर्यावरणीय बदल हे सतत आपल्या आयुष्यावर परिणाम करीत असतात. यात कुठेही पर्यावरणाशी आपले २८ल्लू्रल्लॅ (संक्रमण) नाही. जिवंत प्राणी खाण्यासाठी निर्माण केलेले आशिया खंडातील विविध देशांतील मोठाले खाटीकखाने, जिथे प्राणी अक्षरश: अमानवीय दृष्टीने कोंबलेले असतात, अशा ठिकाणी कित्येक विषाणू जनुकीय परिवर्तन करून प्राण्यांमधून माणसांमध्ये येत असतात. हा काही पहिला कोरोना विषाणू आलेला नाही. असे अनेक कोरोना विषाणू आजवर आपल्या पिढीत येऊन त्यांच्या  साथी येऊन गेल्या आहेत. जसे मागे वटवाघळे व डुकरांतील विषाणूंचे combination होऊन swine acute diarrhoea syndrome आला होता जो SADS-CoV या कोरोना विषाणूपासून आला होता किंवा सौदी अरेबियात Middle East respiratory syndrome (MERS) हा २०१२ मध्ये MERS-CoV मुळे आला होता. MERS मध्ये मृत्यूदर ३४.४ टक्के इतका अधिक असल्याने रुग्ण बºयाचदा घरीच मरून जायचा. त्यामुळे तो फक्त २८ देशांमध्ये पसरला. कोविड-१९ मध्ये मृत्यूदर ३.९ टक्के आहे म्हणजेच साधारण ९६ टक्के लोक बरे व्हायला हवेत.  त्याचा The basic reproduction rate म्हणजेच R-naught (RO) हा साधारण १.७ ते २.४ असल्याने अधिक व्यक्तींना त्याची लागण होत आहे. उदा. जर एखाद्या रोगाचा R-naught १.३ असेल, तर १,००० रुग्णांमुळे एका सायकलमध्ये १,३०० लोकांना लागण होऊ शकते व दहाव्या सायकलमध्ये म्हणजे अनियंत्रित असल्यास ४२,६२१ लोकांना लागण होऊ शकते.  Lockdown मध्ये जेव्हा लोक नियमांचे काटेकोर पालन करतात तेव्हा R-naught  कमी होतो, जो १ च्या खाली आल्यास परिस्थतीत सुधारणा करता येऊ शकते.

निसर्ग आणि मानवी आरोग्य यांचा इतका घनिष्ठ संबंध आहे की, निसर्ग सुरक्षित ठेवल्याशिवाय मानव जातीस काहीही भविष्य नाही. गेल्या एका महिन्यात आपण बघितले, तर कोरोनाच्या केसेस वाढणे, टोळधाड आणि आता चक्रीवादळ ही संकटे एकाच वेळी आली आहेत आणि यास कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत, हे जागतिक ते गावपातळीवर कुठेही भांडणे न करता मानवजातीने मान्य करून त्वरित उपाय केले, तरच आपल्यास आपल्या पुढच्या पिढीसाठी काही करता येण्यासारखे आहे.आता उपायांकडे बघू या :१. जागतिक पातळीवर : सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आरोग्याची व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने व्यापक करणे व त्यात आरोग्य व पर्यावरणीय बाजू ही संकल्पना मांडणे अत्यावश्यक आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेस एका शिष्टमंडळाने निवेदन देता येईल, जेणेकरून त्यांच्याकडून पर्यावरणीय बाबी व मानवी आरोग्य यावर संशोधन सुरु होईल.२. वैयक्तिक व सामाजिक पातळीवर :- प्रदूषण करणाºया सर्व घटकांना कायद्यानुसार प्रदूषण कमी करण्यासाठी समाजातील समविचारी लोकांचे pressure groups तयार करणे जरूरी आहे. कायद्याचे ज्ञान नसल्याने केमिकल फॅक्टºयांपासून लोक वर्षानुवर्षे नुसते आपले आरोग्य धोक्यात ठेवत असतात.- मोठ्या प्रमाणावर युवावर्गाला सोबत घेऊन स्थानिक झाडे प्रचंड प्रमाणात लावली पाहिजेत. शेतीतही स्थानिक वाण आणि जनावरांना स्थानिक चारा उपलब्ध केला पाहिजे. स्थानिक झाडांवर कीड खूप कमी येते. मुख्य म्हणजे स्थानिक झाडे अन्नसाखळीत खूप महत्त्वाचा भाग आहेत. पशू-पक्ष्यांना व मधमाशांना अन्न, परागीभवन आणि अन्नसाखळी व्यवस्थित चालणे या सर्व प्रक्रियेत स्थानिक जंगली झाडे महत्त्वाचा घटक आहेत. ही झाडे आज १ टक्क्यापेक्षाही कमी शिल्लक आहेत. त्यामुळे UN चा एक रिपोर्ट म्हणतो की, २०  वर्षांतच आपल्याला oxygen  बारमध्ये जावे लागेल.- शाळेतील अभ्यासक्रमात कोणती झाडे, कुठे, कधी, कशी आणि का, हे प्रकरण प्रत्येक परिसर अभ्यासात असलेच पाहिजे, ज्यामुळे कॉलेजमध्ये येईपर्यंत अन्नसाखळी जपण्यासाठी संवेदनशील प्रशिक्षित युवावर्ग तयार होईल व त्यावर काम करील.- शासनाने व गावपातळीवर हिरवा रोजगार उपलब्ध केला पाहिजे, ज्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.- शेवटचे म्हणजे पर्यावरण मला जगण्यास अन्न, पाणी, प्राणवायू आणि कितीतरी अधिक देते, मी पर्यावरणाचे काही देणे लागतो, ही भावना निर्माण करणे आणि जपणे हे प्रत्येक परिवाराचे आद्यकर्तव्य आहे आणि जे प्रत्येकाने केले पाहिजे.अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी आपण सर्वच प्रयत्नशील असतो. अर्थ म्हणजे meaning पैसा आणि इंग्रजीत पृथ्वी किंवा निसर्ग. या तिघांचाही समतोल असेल, तरच मानवी जीवन सुखी राहू शकते. फक्त या तिघांमध्ये पैसा इतका वरचढ झाला आहे की, आपण बाकी दोन सोडून पळत्याच्या पाठी लागलो आहोत. त्यात विविध रोग, ताणतणाव आणि भांडणे यामागे आयुष्य जाते. ते सर्व विसरायला आपण निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जातो. म्हणजे पहिले पैशाच्या मागे लागून निसर्गाचा विनाश करायचा आणि मग पैशाने शरीर पोखरले की, निसर्गाच्या कुशीत जायचे. हा मानवी स्वभावाचा पैलू खरे मला कधीच उमगला नाही. एक सुंदर कविता आहे.

I go down to the shore :I go down to the shore in the morningand depending on hour the wavesAre rolling in or moving out,And I say, oh I am miserable,What shall-What should I do? And the sea saysin its lovely voice :Excuse me, I have work to do.Mary Oliverनिसर्ग निसर्गाचे काम करतोच आहे. आपण आपल्या जीवनात कुठल्या अर्थाला महत्त्व द्यायचे ते आजच ठरविणे गरजेचे आहे. कारण आपल्या आजच्या निर्णयावर पुढील हजारो पिढ्या अवलंबून आहेत.

 

- डॉ. शीतल आमटे-करजगी,मुख्य कार्यकारी अधिकारी,महारोगी सेवा समिती, वरोरा,(आनंदवन)  

टॅग्स :World Environment DayWorld Environment Dayenvironmentपर्यावरण