शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पर्यावरणाचे नुकसान;  राज्य शासनाला १३.८८ कोटी रुपये भरण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 17:52 IST

पर्यावरणाचे नुकसान पोटी १३ कोटी ८८ लक्ष २५ हजार भरण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवाद, दिल्ली ने दिले आहे.

- विजय मिश्राशेगाव :  शेगाव विकास आराखडा अंतर्गत राज्य जीवन प्राधीकरणतर्फे करण्यात आलेली सिवरेज ( भू - गटार ) योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने पर्यावरणाचे नुकसान पोटी १३ कोटी ८८ लक्ष २५ हजार भरण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवाद, दिल्ली ने दिले आहे.शेगाव शहरात दहा वर्षांपासून प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. जमिनीचा पोत घसरल्याने बोरवेलचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने दिल्याने राज्य शासनाला वर्ष २०१९ मध्ये राष्ट्रीय हरित लवादला एक कोटी रुपयाची बँक हमी द्यावी लागली होती. परंतु त्यानंतर प्रशासनिक ताळमेळ नसल्याने आतापर्यंत झालेल्या पर्यावरणाचे नुकसान पोटी १३ कोटी ८८ लक्ष २५ हजार भरण्याचे आदेश दिले आहे. शेगाव विकास आराखड्या अंतर्गत २०१० - ११ मध्ये ३३ कोटी रुपयाची भू - गटार योजनेच्या कामाला राज्य शासन कडून मंजुरात देण्यात आली. सदर योजनेचे काम दिल्ली येथील एस एम एस या कंपनी ला देण्यात आले. यामध्ये शेगाव शहरात ६४ कि.मी ची भू - गटार योजनेकरीता पाईप लाईन टाकने, सफाई करिता चेंबर बांधणे, यामधून येणाºया घाण पाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी करणे इत्यादी अनेक प्रकारचा कामाचा समावेश होता. काम तीन वर्षात पूर्ण करणे, त्यापुढील तीन वर्ष त्याची निगा राखण्याची जबाबदारी कंपनीची होती. मात्र या कंपनीने आठ वर्षात शेगाव शहरात ६४ पैकी ५२ की.मी ची पाईप लाईन टाकली होती. टाकण्यात आलेल्या पाईप लाईनचे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार शेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश जयपुरीया व गोपाल चौधरी यांनी राष्ट्रीय हरित लवादमध्ये सन २०१७ - १८ मध्ये तक्रार केली. त्यानंतर २४ सप्टेंबर २०१९ मध्ये पुणे येथून व्हिडिओ कांफर्सिंगच्या माध्यमातून सुनावणी करण्यात आली. ज्यामधे तक्रारकर्त्यांना कोणताही वकील न लावता बाजू मांडण्याची परवानगी देण्यात आली. त्यामध्ये उपरोक्त चुकीची जबाबदारी कुठलीही शासकीय विभाग घ्यावयास तयार नसल्याचे दिसून आले. त्यामुळे लवादचे तीन सदस्य न्यायधीशांनी राज्याच्या मुख्य सचिवांना आदेश देऊन दोन आठवड्यात एक कोटी रुपयाची बँक हमी द्यावयास लावली होती. असे असतांनाही उपरोक्त प्रकरणातून राज्य शासनाने कोणतीही गंभीर दखल घेतली.त्यानंतर सहा महिन्याचा अवधी मिळूनही उपरोक्त योजनेतील त्रुटी कंत्राटदार कंपनीकडून पूर्ण करण्यात आल्या नाहीत. त्यानंतर  १५ जून २०२० ला न्यायधीश शिवकुमार सिंग, सिद्धांत दास यांनी केलेल्या आदेश प्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांनी केलेल्या पाहणी ५ निष्कर्ष प्रमाणे शेगाव शहरातील वातावरण प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते व आजही याबाबत शासनाचे प्रत्येक विभाग ही जबाबदारी टाळत आहे. त्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोडार्ने आजपर्यंत पर्यावरणाचे झालेल्या नुकसानपोटी १३ कोटी ८८ लक्ष २५ हजार रुपयांचे सांगितले आहे. सदर रक्कम शासनाने पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर २०२० चा आधी जमा करावयाची आहे. असे आदेश राष्ट्रीय हरित लवाद, दिल्ली यांनी दिले आहे .  

 भू - गटार योजनेतील कामात अनेक त्रुटी व दोष असल्याने मागील अनेक वर्षांपासून शेगाव नगरपालिका व शहरातील जनता अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. याबाबत आम्ही वारंवार शासनाला , जीवन प्राधिकरण, संबंधित कंत्राटदारांना अनेकवेळा पत्र पाठविले.परंतु कारवाही होताना दिसत नाही.- प्रशांत शेळके,  मुख्याधिकारी , न. प शेगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणाShegaonशेगावenvironmentपर्यावरण