शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

CoronaVirus : कोरोनाची इष्टापत्ती; भविष्यात रस्त्यांवरील आणि हवेतीलही वाहतूक कमी होणार

By गजानन दिवाण | Updated: April 16, 2020 12:10 IST

भविष्यात रस्त्यांवरील आणि हवेतील वाहतूक बऱ्यापैकी कमी होईल.

ठळक मुद्दे‘वर्क फ्रॉम होम’चा परिणामलॉकडाऊनमुळे ५०% प्रदूषण कमी झाले

- गजानन दिवाणऔरंगाबाद : कोरोनाच्या संकटातून बाहेर आल्यानंतर आर्थिक संकटाला सामोरे जाताना जगभरासह भारतातही अनेक कंपन्या ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य देतील. परिणामी, रस्त्यांवरील आणि हवेतीलही वाहतूक कमी होऊन प्रदूषण कमी होईल, असा अंदाज उद्योगजगताच्या हवाल्याने पर्यावरणतज्ज्ञांमधून व्यक्त केला जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास ५० टक्के प्रदूषण कमी झाले आहे. आॅटोमोबाईल क्षेत्रात भारतीय बाजारपेठ जगभरात पाचव्या क्रमांकाची आहे. साधारण अडीच कोटी नवीन वाहने भारतात दरवर्षी रस्त्यावर उतरतात. एकूण प्रदूषणात वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचा वाटा ११ टक्केअसल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने आधीच दिलेला आहे. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे हे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

सध्या ‘कोरोना’च्या संकटामुळे मॅन्युफॅक्चर कंपन्या वगळता टिष्ट्वटर, इन्फोसिस, अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, पेटीएम, विप्रो, स्विगी, ओला, उबेरसारख्या अनेक कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ची अंमलबजावणी सुरू केली आहे. भारतात इन्फोसिसचे जवळपास दोन लाख कर्मचारी सध्या घरातूनच काम करीत आहेत. एका इंग्रजी न्यूज एजन्सीच्या अहवालानुसार, भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या जवळपास ५० टक्केम्हणजे ३० लाख कर्मचा-यांनी घरातूनच काम सुरू केले आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर आल्यानंतर आर्थिक संकटाशी सामना करताना हे ‘वर्क फ्रॉम होम’ कल्चर अनेक कंपन्यांमध्ये कायम राहील, असे ‘इन्फोसिस’मध्ये काम करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ विषयातले तज्ज्ञ आणि अमेरिकेतील फाइंड अ‍ॅबिलिटी सायन्सेस कंपनीचे संस्थापक व सीईओ आनंद माहूरकर हे मूळ बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे. ते म्हणाले, अमेरिकेत ‘वर्क फ्रॉम होम’ हे आधीपासून मोठ्या प्रमाणात होते. आता ‘कोरोना’मुळे त्याला गती मिळाली आहे. माझ्या कंपनीतील सर्वच कर्मचारी घरातूनच काम करतात. माझी मेडिकलचा अभ्यास करणारी मुलगी सकाळी नऊ ते रात्री नऊ आॅनलाईन असते. ‘कोरोना’ संपल्यानंतरही आर्थिक टंचाईतून मार्ग काढत असताना अनेक कंपन्या हाच मार्ग अवलंबतील. अमेरिकेत लीजवर जागा घेतलेल्या अनेक कंपन्यांनी करार रद्द करणे सुरू केले आहे. भविष्यात हे कोणालाच परवडणारे नाही, असे माहूरकर म्हणाले.

प्रदूषण कमी होणारआर्थिक मंदीमुळे लॉकडाऊनच्या काळातील ‘वर्क फ्रॉम होम’सारख्या काही गोष्टी पुढेही तशाच सुरू ठेवाव्या लागतील. आॅनलाईन बैठका (व्हीसी-फोन कॉन्फरन्स) अशाच सुरू राहतील. त्यामुळे भविष्यात रस्त्यांवरील आणि हवेतील वाहतूक बऱ्यापैकी कमी होईल. ओघाने प्रदूषणही कमी होईल, अशी प्रतिक्रिया पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी दिली.

हवेतील प्रदूषणामुळे दरवर्षी ७० लाख नागरिकांचा बळीइंटरनॅशनल कौन्सिल आॅन क्लीन ट्रान्स्पोर्टेशन (आयसीसीटी)च्या अहवालानुसार भारतातील दोनतृतीयांश मृत्यू हे हवेतील प्रदूषणामुळे होतात. यातही डिझेल वाहनांमुळे होणारे प्रदूषण अधिक घातक असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात हवेतील प्रदूषणामुळे दरवर्षी तब्बल ७० लाख नागरिकांचा बळी जातो. एकूण प्रदूषणात वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचा वाटा ११ टक्के आहे. ‘लॉकडाऊन’नंतरही या प्रदूषणात घट होत जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादpollutionप्रदूषण