शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अग्रण धुळगाव येथे २५ एकरमध्ये साकारणार जैवविविधता उद्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 13:11 IST

environment Bio Diversity Sangli : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जैवविविधता उद्यान अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे तयार करण्यात येत आहे. २५ एकर क्षेत्रात विविध प्रजातींची १६ हजार झाडे लावली जातील. अभिनेते सयाजी शिंदे यांनी याकामी पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देअग्रण धुळगाव येथे २५ एकरमध्ये साकारणार जैवविविधता उद्यानयेत्या आठवड्यात प्रत्यक्ष वृक्षारोपणाला प्रारंभ होणार

संतोष भिसेसांगली : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जैवविविधता उद्यान अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे तयार करण्यात येत आहे. २५ एकर क्षेत्रात विविध प्रजातींची १६ हजार झाडे लावली जातील. अभिनेते सयाजी शिंदे यांनी याकामी पुढाकार घेतला आहे.शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात अशी देवराई निर्माण केली आहे, तशीच आता अग्रण धुळगावमध्येही दिसेल. त्याच्या तयारीसाठीची व्यापक बैठक शनिवारी ऑनलाईन स्वरुपात झाली. सह्याद्री देवराईचे अध्यक्ष तथा अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह लेखक अरविंद जगताप, उपवन संरक्षक विजय माने, मधुकर फल्ले, सचिन चंदने, विजय निंबाळकर, वनस्पतीशास्त्रज्ञ सुहास वायंगणकर, शिल्पकार किशोर ठाकूर, चित्रकार केशव कासार, अग्रणी फाऊंडेशनचे शिवदास भोसले आदी सहभागी झाले.अग्रण धुळगावपासून अर्धा किलोमीटर अंतरावर उद्यान साकारत आहे. वृक्षारोपणासाठी वन विभागाने खड्डे काढले आहेत. विविध १५० प्रजातींची झाडे सह्याद्री देवराईकडून दिली जातील, त्यातील २० प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावरील आहेत. पाणीपुरवठ्यासाठी ठिबक व अन्य अनुषंगिक खर्चही देवराई करणार आहे.

झाडे लावण्याच्या मोहिमेत स्थानिक स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळे, विद्यार्थी व वृक्षप्रेमी सहभागी होत आहेत. २५ एकर क्षेत्र वनविभागाच्या मालकीचे आहे. त्यामध्ये विविध सहा उद्याने तयार केली जातील. आयुर्वेदीक वनस्पती, फळझाडे, लहान मुलांसाठी व वृद्धांसाठी उद्याने, ऑक्सिजन देणारी झाडे असे वैविध्य राखले जाणार आहे.येत्या आठवड्यात प्रत्यक्ष वृक्षारोपणाला प्रारंभ होणार आहे. झाडांच्या संगोपनासाठी अग्रणी पाणी फाऊंडेशन, सह्याद्री देवराई तसेच ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. सांगली जिल्ह्यात या प्रकारचे हे पहिलेच इतके मोठे जैवविविधता उद्यान असल्याचे फाऊंडेशनचे शिवदास भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :environmentपर्यावरणBio Diversity dayजैव विविधता दिवसSangliसांगली