शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

नर्सरीत प्रवेश नेमका द्यायचा कोणाला ? अडीच की तीन वर्षे; वयाबाबत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 08:40 IST

- रेश्मा शिवडेकर  लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईसह राज्यभरात बहुतांश शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्गाची २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश ...

- रेश्मा शिवडेकर लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह राज्यभरात बहुतांश शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्गाची २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली, तरी विद्यार्थ्यांच्या वयाबाबत असलेला संभ्रम कायम आहे. अडीच वर्षे पूर्ण झालेल्या मुलाला नर्सरीत प्रवेश द्यायचा की तीन, याबाबत शाळांमध्ये गोंधळाचे वातावऱण असून हा संभ्रम तातडीने दूर करण्याची मागणी होत आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या वयासंबंधीच्या नियमानुसार सध्या साडेपाच वर्षांच्या मुलाला पहिलीत प्रवेश देता येतो. कारण ,शिक्षण हक्क कायद्यानुसार वय वर्षे सहापर्यंतचे शिक्षण कायद्याच्या चौकटीत येत नाही. शाळा याचा फायदा घेत अडीच वर्षांच्या मुलांनाही नर्सरीत प्रवेश देतात. दुसरीकडे राष्ट्रीय शिक्षण धोरण किंवा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार नर्सरीकरिता वय वर्षे तीन पूर्ण केलेली असावी. जेणेकरून मूल पहिलीत येईपर्यंत ते सहा वर्षांचे असेल. परंतु, त्यासाठी पूर्व प्राथमिक शिक्षणविषयक कायदा करणे आवश्यक आहे. त्यामुळे  नर्सरीसह, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी शिक्षणाचेही नियमन होईल.

 बदल लवकरच होणार   महाराष्ट्रात वयाबाबतच्या जुन्याच नियमांचा आधार घेतला जात आहे. म्हणून राष्ट्रीय शिक्षण धोरण किंवा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुरूप त्यात बदल करण्याची मागणी ‘अर्ली चाईल्डहुड असोसिएशन -प्राथमिक शिक्षण आणि संशोधन संस्थे’च्या अध्यक्ष डॉ. स्वाती पोपट-वत्स यांनी राज्यपालांना पत्र लिहून केली आहे. राज्यपालांनी यात हस्तक्षेप करून कायद्यात बदल करण्याची सूचना राज्य सरकारला करावी, असे वत्स यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. या संभ्रमाबाबत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी, तीन वर्षे पूर्ण झालेल्यांनाच नर्सरीत प्रवेश देणे शाळांना बंधनकारक असेल. २०२४-२५ पासून हा बदल लागू करण्याचा विचार असल्याचे सांगितले. 

मुलांच्या वयातील फरक अवघ्या तीन ते सहा महिन्यांचा असला, तरी या वयात त्यांना ज्या पद्धतीने शिकविले जाते त्याचा परिणाम त्यांच्या भाषा, सामाजिक-भावनिक विकासावर होतो. पुढे अनेक हानीकारक परिणामांना आयुष्यभर त्यांना सामोरे जावे लागते.- स्वाती पोपट-वत्स

टॅग्स :Schoolशाळा