शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या फेरीत पसंतीचे महाविद्यालय कोणाला? आज जाहीर होणार यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 07:54 IST

राज्य व केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांमध्ये चुरस

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी पहिली गुणवत्ता यादी बुधवारी सकाळी १० वाजता विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याला त्याच्या लॉगिनमध्ये त्याला मिळालेल्या महाविद्यालयांची यादी दिसणार आहे. शिवाय  महाविद्यालयांचे कट ऑफही संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. 

मुंबई विभागाच्या जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीमध्ये ९० टक्क्यांवर राज्य मंडळाचे ७ हजार ९४६ विद्यार्थी आहेत, तर सीबीएसई मंडळाचे १ हजार ५७३ व आयसीएसई मंडळाचे ३ हजार ८४५ विद्यार्थी आहेत. ८० टक्क्यांच्यावर राज्य मंडळाचे ३९ हजार ११५ विद्यार्थी आहेत. सीबीएसईचे १,८७४ व आयसीएसई मंडळाचे ३,४५४ विद्यार्थी आहेत. त्यामुळे पहिल्या यादीत किती विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळणार आणि त्यात पसंतीचे महाविद्यालय कोणाला मिळणार, यात चुरस असणार आहे.

मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी एकूण ३,७१,२७५ जागा उपलब्ध आहेत. यामधील कॅप फेरीतून भरल्या जाणाऱ्या जागांची संख्या २ लाख ३० हजार ९२७ असून कोट्याच्या १ लाख ४० हजार ३३८ जागा आहेत. याउलट मुंबई विभागातून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लक्ष ८ हजार इतकी आहे.  त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये किती विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीप्रमाणे मुंबई विभागात ९५ ते १०० टक्क्यांमधील तब्बल३,७८३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

७५ ते ९५ टक्क्यांमध्ये तब्बल १० हजार २६० विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे. ७५ टक्क्यांखालील १ लाख ७४ हजार ४३७ विद्यार्थ्यांना सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळाले आहे.  मंगळवारी रात्रीपर्यंत कोट्याच्या उपलब्ध १.४० लाख जागांपैकी १४ हजार २२६ जागांवर प्रवेश झाले असून त्यातील १ लाख २६ हजार १२२ जागा अद्याप रिक्त आहेत.