शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रम पूर्ण कधी होणार? अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरूच असल्याने महाविद्यालय प्रशासनासमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 06:07 IST

मुंबई विभागात या माध्यमातून आतापर्यंत रोज दीडशे- दोनशे हून अधिक विद्यार्थी प्रवेशित होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दैनंदिन गुणवत्ता फेरीच्या माध्यमातून सध्या अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू असून, मुंबई विभागातून रोज १०० हून अधिक विद्यार्थी या माध्यमातून प्रवेश घेत आहेत. ही प्रक्रिया येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, या काळात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा पूर्ण करून घ्यायचा? या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कधी घ्यायच्या आणि अकरावीचे शैक्षणिक स्तर कसे पूर्ण करायचे, असा प्रश्न आता महाविद्यालयांकडून उपस्थित केला जात आहे. 

२१ ऑक्टोबरपासून दिवाळी सुट्टीला सुरुवात होणार असल्याने, त्या आधी या विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालयीन प्रशासनाला पूर्ण करून घ्यायच्या असतात. त्यामुळे महाविद्यालयीन प्रशासन आता उशिरापर्यंत सुरू असलेल्या या प्रवेश प्रक्रियेमुळे कोंडीत सापडले आहे.दैनंदिन गुणवत्ता फेरीची ही सुविधा १ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, सायंकाळी ७ ते सकाळी ९ पर्यंत विद्यार्थ्यांना या दरम्यान प्रवेशासाठी अर्ज करता येतो. त्याच दिवशी विद्यार्थ्यांना आपल्या प्रवेशाची निश्चिती ही करता येते. 

मुंबई विभागात या माध्यमातून आतापर्यंत रोज दीडशे- दोनशे हून अधिक विद्यार्थी प्रवेशित होत आहेत. प्रवेशित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी असली, तरी या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याचे आव्हान आता प्राचार्य आणि शिक्षकांपुढे उभे राहिले आहे. दिवाळीपूर्वी परीक्षा पूर्ण करून घ्यायच्या असल्याने, अनेक महाविद्यालयांनी परीक्षांचे नियोजन केलेले आहे. मात्र, नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे आणि केव्हा करायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. 

आतापर्यंतच्या दैनंदिन फेऱ्यांमधून १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश या प्रवेश फेरीच्या दरम्यान कोटा आणि द्विलक्षी प्रवेश प्रक्रियाही नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे  दुबार प्रवेश घेणारे किंवा जाणीवपूर्वक जागा अडवून ठेवत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत कडक कारवाई केली जाईल, असे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या दैनंदिन गुणवत्ता फेरीमधून मुंबई विभागात १० हजारांहून पुढील प्रवेश निश्चित झाले आहेत. 

टॅग्स :collegeमहाविद्यालय