UPSC Exam : देशातील सर्वात कठीण परिक्षेत UPSC ची गणना केली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षा देतात, पण काही मोजकेच परीक्षेत यशस्वी होतात. दरम्यान, आज(22 एप्रिल 2022) संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा (UPSC CSE 2024) चा निकाल लागला. यंदा प्रयागराजच्या शक्ती दुबेने परीक्षेत अव्वल स्थान पटकावले, तर हर्षिता गोयलने दुसरा आणि पुण्याचा अर्चित डोंगरेने देशात तिसरा येण्याचा मान मिळवला.
यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना त्यांच्या रँकनुसार उमेदवारांना भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलिस सेवा (IPS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये नियुक्ती मिळते. निवडलेल्या उमेदवारांना प्रथम लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) मसुरी येथे पाठवले जाते, जिथे त्यांना प्राथमिक प्रशिक्षण दिले जाते. येथील प्रशिक्षण सुमारे 3 ते 4 महिने चालते. या काळात उमेदवारांना स्टायपेंडच्या स्वरुपात पगार मिळू लागतो.
पहिला पगार कधी आणि किती मिळतो?उमेदवार LBSNAA मध्ये जॉईन करताच त्यांना मूळ वेतन आणि भत्ते मिळण्यास सुरुवात होते. पहिल्या महिन्याचा पगार अनेकदा प्रशिक्षणाच्या पहिल्या महिन्याच्या शेवटी किंवा दुसऱ्या महिन्याच्या सुरुवातीला बँक खात्यात हस्तांतरित केला जातो. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दरमहा सुमारे 55,000 ते 60,000 रुपये पगार मिळतो.
प्रशिक्षणानंतर पगारजेव्हा हे उमेदवार त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करतात आणि पोस्टिंगसाठी जातात, तेव्हा त्यांचे वेतन 56,100 रुपयांपासून (लेव्हल-10 पे ग्रेड) सुरू होते. यामध्ये, एचआरए, टीए, डीए इत्यादींसह, सुरुवातीचा इनहँड पगार 70,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत असतो. याशिवाय उमेदवारांना घर, गाडी, नोकर, फोनबिलसह इतर अनेक सुविधा देखील मिळतात.