शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नापास झालात म्हणून काय झालं? अंधारवेळा येतात-जातात, त्यात आपण कशाला हरवायचं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 08:21 IST

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काहीवेळा नकारात्मक गोष्टी येतात, पुढे अंधार दिसायला लागतो; पण उजेडाच्या वेळाही प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच...

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काहीवेळा नकारात्मक गोष्टी येतात, पुढे अंधार दिसायला लागतो; पण उजेडाच्या वेळाही प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच...

अभ्यास, करिअर या सगळ्या आयुष्यातल्या सकारात्मक गोष्टी आहेत; पण नेमकं काही मुलांच्या बाबतीत त्या तितक्याशा सकारात्मक राहात नाहीत. याचं कारण नकारात्मक शब्दांची मालिका अभ्यासाला जोडून आलेली असते. जसं, माझं बरोबर असेल का, माझा अभ्यास झाला नव्हता, खूप चुकलं असेल का, भविष्याबद्दलची अपार भीती, वर्तमानात योग्य विचार करू न शकणं,  अभ्यास, करिअर, दडपण, ओझं... अशा या नकारात्मक शब्दांच्या आणि भावनेच्या गुंत्यात आपण केव्हा अडकत जातो, हे कोणालाच समजत नाही. 

या नकारात्मकतेत राहणं कोणासाठीच योग्य नाही. म्हणून कायम अनेक पर्यायांचा विचार करून ठेवायचा असतो. पर्याय आपल्याला हे सांगतात की, एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर दुसरी गोष्ट आहे. ती करता येण्यासारखी आहे. यातून मनाला उभारी मिळते. 

आपल्याकडे दहावी आणि बारावी या शब्दांना खूप महत्त्व आलेलं आहे. पण त्यातून बहुतांश मुलांचं नुकसानच जास्त होतं, हे लक्षात आल्यामुळे त्याचं महत्त्व कमी करण्याचाही प्रयत्न सातत्याने विविध पातळ्यांवर होत असतो. उदाहरणार्थ, गुणवत्ता यादी बंद करणं हे फार महत्त्वाचं पाऊल होतं. आता विविध विषयांच्या सीईटी होतात. बारावीला गुण कितीही असले तरी सीईटी असतेच. तिथे आपल्याला लगेच पुन्हा प्रयत्न करता येतात. 

मुख्यत: लेखन, वाचन, स्मरणशक्ती यावर या परीक्षा आधारित असतात. या तीन कौशल्यांवर आधारित अनेक परीक्षा आपण देऊ शकतो. त्यात छान पद्धतीने यशस्वीही होऊ शकतो; पण आयुष्य या तीन गोष्टींपुरतं मर्यादित नसतं. त्यासाठी सहनशक्ती, उद्योजकता, सृजनशीलता, आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची क्षमता अशा अनेक गोष्टी जमल्या पाहिजेत. कधी कोणती गोष्ट लागेल, हे सांगता येत नाही. 

आपण या गोष्टी जमवायच्या ठरवल्या की त्या जमतात. आयुष्य जमून येण्यासाठी हेच आवश्यक असतं. अंधाराच्या वेळा येतात आणि जातात... त्या अंधारात हरवून जायचं नाही; आपला आपण उजेड करायचा एवढं ठरवलं तरी पुरे आहे!  

पालकांनी लक्षात ठेवावं...मुलांना ताण असतोच, त्यांनी चेहऱ्यावर किंवा वर्तनातून  दाखवला, नाही दाखवला तरी ताण असतोच. त्यात आपण नकारात्मक शब्द बोलत राहिलो, तर तो ताण अजून वाढतो. नकारात्मक भावना अजून वाढतात आणि मुलं विचार करत करत कुठे जाऊन पोहोचतील आणि काय कृती करतील, हे सांगता येत नाही.   

या काळात मुलं बहुतेकवेळा पालकांच्या आसपास असतात. कारण शाळा, महाविद्यालय यांना सुट्टी असते. अशावेळेला शब्द जपून वापरा. सगळं नीट होईल, आयुष्य कधी थांबत नसतं, अडचणी आल्या तरी त्यातून वाट काढायची असते, कोणतीच परीक्षा कधीच अंतिम नसते, एक दार बंद झालं तर दुसरी अनेक दारं उघडत असतात, अनेक शक्यता निर्माण होत असतात... अशा शब्दांची पेरणी अधूनमधून करत राहायला हवी. कारण  हे सकारात्मक शब्द आहेत. जीवन कसं जगायचं असतं, हे दर्शविणारे हे शब्द आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेंदूत ‘आनंदाची रसायनं’ निर्माण करणारे हे शब्द आहेत.- डॉ. श्रुती पानसे, करिअर समुपदेशक

टॅग्स :Educationशिक्षणSSC Resultदहावीचा निकाल