शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ॲडमिशन घ्यायचीय? कागदपत्रे तयार ठेवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2023 13:41 IST

दहावी आणि बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत.

- श्रीकांत जाधव

दहावी आणि बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. आता पुढील प्रवेशासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची धावाधाव सुरू होईल. कोणत्याही शाखेत प्रवेश घ्यायचा असला, तरी काही मूळ कागदपत्रे लागतातच. त्यासाठी काय तयारी करायला हवी, कोणती कागदपत्रे गरजेची आहेत, त्याचा हा आढावा...

आवश्यक कागदपत्रे कोणती ?

-  दहावी आणि बारावीची मूळ गुणपत्रिका-  शाळा सोडल्याचा दाखला-  चारित्र्याचे प्रमाणपत्र-  निवासी पत्त्याचा पुरावा म्हणून रेशनकार्ड किंवा वीजबिल-  डोमिसाइल प्रमाणपत्र-  जात प्रमाणपत्र-  नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र-  उत्पन्नाचा दाखला-  आधार कार्ड-  पासपोर्ट फोटो.

वय/डोमिसाइल/राष्ट्रीयत्व दाखला कोठे मिळणार ?

इंजिनीअरिंग, मेडिकल अभ्यासक्रमासाठी अधिवासाचे प्रमाणपत्र आवश्यक ठरते. मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर जिल्हा तहसीलदारांकडे अर्ज करावा लागतो. जन्म महाराष्ट्रात असेल त्यांना डोमिसाइलसाठी सूट आहे, तरीही महाराष्ट्र अधिवास, तसेच राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे योग्य असते. हे प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातून मिळवता येते.

उत्पन्नाचा दाखला / नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र

प्रवेश अर्ज किंवा शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो. तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सिद्ध करणारे पुरावे यासाठी लागतात. तसेच क्रिमिलेअर / नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र / आमदारांकडून मिळणारे ओळख प्रमाणपत्र आवश्यक असते.

जात प्रमाणपत्र / जात पडताळणी प्रमाणपत्र

राखीव जागांचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र लागते. तसेच जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घ्यावी लागते. वर्षभर जातीचे दाखले दिले जातात. मात्र, निकालापूर्वी म्हणजे एप्रिल / मे महिन्यात अर्जांची गर्दी होते. तेव्हा वेळीच प्रमाणपत्र काढून घ्यावे. जातीचे प्रमाणपत्र जलद गतीने देण्यासाठी तहसीलदार कार्यालयात सेतू केंद्र आहेत. महा ई-सेवा केंद्र / आपले सरकार येथे अर्ज करावा लागतो.

त्यानंतर विभागीय जात पडताळणी समित्यांकडून जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घ्यावी लागते. यासाठी जातीचे मूळ प्रमाणपत्र, प्रमाणपत्रांची साक्षांकित प्रत, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वडिलांचे प्राथमिक शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आजोबा/मोठे काका/मोठ्या आत्याचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे शपथपत्र अशी कागदपत्रे जोडावी लागतात. जात पडताळणीसाठी उमेदवार गेल्यावर त्याची मुलाखत घेतली जाते. यावेळी कागदपत्रांच्या सत्यतेबाबत प्रश्न विचारले जातात.

अर्ज कोठे कोठे  करता येतो ? 

-  जिल्हा तहसील कार्यालय मुंबई शहरासाठी ओल्ड कस्टम, शहर जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबई उपनगरासाठी अंधेरी, बोरिवली, कुर्ला तहसील आहे. 

-  तसेच सेतू कार्यालय, महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार संकेतस्थळावर अर्ज करू शकता.

 

टॅग्स :Educationशिक्षणCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन