शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

परीक्षेपूर्वी आई गेली, वडिलांनी खंबीर साथ दिली; अंकिता चौधरी यांची IAS पदाला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 18:47 IST

Success Story: दुसऱ्याच प्रयत्नात देशभरात 14वा क्रमांक मिळवून अंकिता चौधरी IAS अधिकारी झाल्या.

UPSC Success Story:केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ही देशातील सर्वात कठीण स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC नागरी सेवा परीक्षा देतात, परंतु फार कमी विद्यार्थी यशस्वी होऊन सरकारी अधिकारी बनतात. अशाच एका UPSC उमेदवाराबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जो पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरला, पण त्याने हार मानली नाही. पुन्हा प्रयत्न केला अन् दुसऱ्या प्रयत्नात देशभरात 14 वी रँक मिळवत IAS पदाला गवसणी घातली.

IAS अंकिता चौधरीहरियाणाच्या रोहतास जिल्ह्यातील रहिवासी अंकिता चौधरी यांचा एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. त्यांचे वडील साखर कारखान्यात अकाउंटंट म्हणून काम करत होते. अंकिता लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हरियाणातच झाले, त्यानंतर पदवीसाठी दिल्लीला आल्या. दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेज (DU) मधून पदवी मिळवली. पदवीनंतर अंकिताने आयआयटी दिल्लीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले.

परीक्षेपूर्वी आईचे निधन अंकिता यांनी कॉलेजच्या दिवसांपासूनच यूपीएससी सीएसईची तयारी सुरू केली. पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर त्या यूपीएससी परीक्षा देण्यासाठी तयार होत्या, परंतु यूपीएससी सीएसईची तयारी करत असताना त्यांच्या आईचे निधन झाले. आईच्या मृत्यूचा त्यांच्यावर खूप खोलवर परिणाम झाला, परंतु त्यांनी हिंमत गमावली नाही. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा जोमाने अभ्यास सुरू ठेवला. वडिलांनी या प्रवासात पूर्ण साथ दिली.

दुसऱ्या प्रयत्नात AIR 14 रँक मिळवली

अंकित यांनी 2017 मध्ये यूपीएससीचा पहिला प्रयत्न दिला, परंतु पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्या. 2018 मध्ये दुसरा प्रयत्न केला अन् यूपीएससी सीएसई परीक्षेत घवघवीत यश मिळवले. त्यांनी देशभरात 14 वा क्रमांक मिळवला आणि आयएएस अधिकारी बनल्या. अंकिता चौधरी यांचे यश हे सर्व यूपीएससी उमेदवारांसाठी प्रेरणादायी आहे.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी