UPSC Exam calendar 2026:केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC ने त्यांचे 2026 साठीचे परीक्षा वेळापत्रक जाहीर केले आहे. यूपीएससीची तयारी करणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट देऊन हे परीक्षा कॅलेंडर तपासू शकतात. परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, संयुक्त भूगर्भशास्त्रज्ञ परीक्षेची अधिसूचना 3 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल, तर पूर्वपरीक्षा 8 फेब्रुवारी रोजी घेतली जाईल.
याशिवाय, अभियांत्रिकी सेवेची अधिसूचना 17 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल, तर परीक्षा 8 फेब्रुवारी रोजीच घेतली जाईल. तसेच, सीबीआय (डीएसपी) परीक्षेची अधिसूचना 24 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल, तर ही परीक्षा 28 फेब्रुवारी 2026 रोजी घेतली जाईल.
नागरी सेवा परीक्षा कधी होणार?युपीएससीच्या कॅलेंडरनुसार, नागरी सेवा 2026 ची पूर्वपरीक्षा 24 मे 2026 रोजी होणार आहे, तर अधिसूचना 14 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध केली जाईल. तर, एनडीए, एनए आणि सीडीएससाठी परीक्षा (I) 12 एप्रिल 2026 रोजी होणार आहे, तर त्याची अधिसूचना 10 डिसेंबर 2025 रोजी जारी केली जाईल.
मुख्य परीक्षा कधी होणार?नागरी सेवा मुख्य परीक्षा 21 ऑगस्ट 2026 रोजी होईल, तर एनडीए आणि एनए आणि सीडीएस II साठी अधिसूचना 20 मे रोजी प्रसिद्ध केली जाईल अन् परीक्षा 13 सप्टेंबर रोजी घेतली जाईल.
आयएफएस परीक्षा कधी होणार?अधिसूचनेनुसार, भारतीय वन सेवेच्या प्राथमिक परीक्षेची अधिसूचना 14 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध केली जाईल, तर 24 मे रोजीच घेतली जाईल. भारतीय वन सेवेची मुख्य परीक्षा 22 नोव्हेंबर रोजी होईल तसेच, 19 जुलै 2026 रोजी केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) पूर्व परीक्षा होईल.