शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 07:41 IST

क्षमतेनुसार निवडता येणार अभ्यासक्रम, विद्यार्थी त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेच्या आधारावर आपल्या अभ्यासक्रमाचा कालावधी कमी किंवा जास्त करण्याचा पर्याय निवडू शकतात.

नवी दिल्ली - देशातील उच्च शिक्षण संस्था आता पदवीपूर्व विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी कमी-जास्त करण्याचा पर्याय देणार आहेत. यासाठी जलद पदवी कार्यक्रम (एडीपी) आणि विस्तारित पदवी कार्यक्रम (ईडीपी) राबवण्याची परवानगी या आठवड्यात झालेल्या बैठकीत उच्च शिक्षण संस्थांना देण्यात आल्याची माहिती केंद्रीय अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष जगदीश कुमार यांनी दिली.

विद्यार्थ्याने एडीपी व ईडीपी यापैकी कोणत्या स्वरुपाचे शिक्षण घेतले त्याचा उल्लेख पदवी प्रमाणपत्रावर करण्यात येणार आहे. यासोबतच ही पदवी पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मानक कालावधीच्या पदवीच्या बरोबरीने ग्राह्य धरली जाणार असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील मसुदा भागधारकांच्या अभिप्रायासाठी लवकरच सार्वजनिक करण्यात येणार आहे. विद्यार्थी त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेच्या आधारावर आपल्या अभ्यासक्रमाचा कालावधी कमी किंवा जास्त करण्याचा पर्याय निवडू शकतात.

काय आहे योजना?

एडीपी अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्रात (सेमिस्टर) अतिरिक्त क्रेडिट्स मिळवून तीन किंवा चार वर्षांच्या कमी कालावधीत पदवी पूर्ण करण्याची परवानगी मिळणार आहे. याशिवाय ईडीपी अंतर्गत प्रत्येक सत्रात कमी क्रेडिट घेऊन अभ्यासक्रमाचा कालावधी वाढवण्याचा पर्याय विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. एडीपी व ईडीपी यापैकी कोणत्याही स्वरुपाचे शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांना मानक कालावधीच्या कार्यक्रमाप्रमाणेच एकूण क्रेडिट्स मिळणार आहेत. 

टॅग्स :Studentविद्यार्थीuniversityविद्यापीठ